मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrakant patil : मी कशासाठीही तयार.. नेहमी माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, चंद्रकांत पाटलांनी सांगितली अंदर की बात

Chandrakant patil : मी कशासाठीही तयार.. नेहमी माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, चंद्रकांत पाटलांनी सांगितली अंदर की बात

Oct 20, 2023, 08:03 PM IST

  • Chandrakant patil on ink throw : दोन वेळा झालेल्या शाईफेकीच्या घटनेवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य करत म्हटले की, मी अशा कोणत्याही घटनेसाठी तयार असतो. माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात. 

Chandrakant patil

Chandrakant patil on ink throw : दोन वेळा झालेल्या शाईफेकीच्या घटनेवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य करत म्हटले की, मी अशा कोणत्याही घटनेसाठी तयार असतो. माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात.

  • Chandrakant patil on ink throw : दोन वेळा झालेल्या शाईफेकीच्या घटनेवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य करत म्हटले की, मी अशा कोणत्याही घटनेसाठी तयार असतो. माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात. 

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्यावर समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने पुण्यात शाईफेक केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहामध्ये भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटी भरती विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला होता. यावर चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

शाईफेकीच्या घटनांबाबत विचारल्यानंतर चंद्रकात पाटील म्हणाले की,मी कशासाठीही तयार असतो, माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो. आतापर्यंत आपल्यावर दोन वेळा शाई फेकली, पण मी पुन्हा लगेच कामाला लागलो असंही ते म्हणाले. आतापर्यंत दोनदा शाई फेकली पण मी तिसऱ्या मिनिटाला लगेच बाहेर पडतो.पालकमंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

चंद्रकात पाटील म्हणाले की, अमरावतीला दर आठवड्याला यावं असा माझा संकल्प आहे. मेळघाटमध्ये मोठा निधी जातो पण अंबलबजावणी होत नाही हे माझ्या निदर्शनास आले त्यामुळे मी मेळघाटात जाणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या