मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra politics : “आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..” अजित पवारांच्या सासरवाडीत लागले पोस्टर, VIDEO

Maharashtra politics : “आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..” अजित पवारांच्या सासरवाडीत लागले पोस्टर, VIDEO

Apr 25, 2023, 04:27 PM IST

  • Ajit pawar banner dharashiv future cm : अजित पवारांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील 'तेर' येथे अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर जागोजागी झळकले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Ajit pawar  banner

Ajitpawarbannerdharashivfuturecm : अजित पवारांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील'तेर' येथे अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर जागोजागी झळकले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • Ajit pawar banner dharashiv future cm : अजित पवारांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील 'तेर' येथे अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर जागोजागी झळकले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar Banner : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र खुद्द अजित पवारांनीच या सर्व अफवा असल्याचे म्हणत आपण राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर एका मुलाखतीत बोलताना अजित पवार म्हणाले की, मला मुख्यमंत्री बनण्याची १०० टक्के इच्छा आहे. त्यानंतर पुन्हा अजित पवार मुख्यमंत्री होणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

काही महिन्यापूर्वी आमदार निलेश लंके यांनी म्हटले होते की, अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत. आता अजित पवारांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील'तेर' येथे अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर जागोजागी झळकले आहेत. तेर गावातील चौकाचौकात "तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार," अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी नवस करण्यासही सुरूवात केली आहे. सासरच्या लोकांनी संत गोरोबा काकांना अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद येण्यासाठी साकडे घातले आहे. मंगळवारी सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.

राज्याच्या राजकारण गेल्या सहा महिन्यापासून अशा काही घडामोडी घडत आहेत, की राजकारणात काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत आहे. त्यातच अजित पवार आता राज्यातील राजकारणातल्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स झळकले होते.

 

आता पुन्हा त्यांच्या सासरवाडीत लागलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी ग्रामस्थांची मनोमन इच्छा आहे. गावातील चौकाचौकात बॅनर्स लागले आहेत.'तेरचे जावई, आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार' असा मजकूर या बॅनर्सवर आहे.

पुढील बातम्या