मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Mude : कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा पहिल्याच आढावा बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

Dhananjay Mude : कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा पहिल्याच आढावा बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

Jul 15, 2023, 09:23 PM IST

  • Dhananjay mude big decision : धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्र्याचा पदभार स्वीकारताच राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Dhananjay Mude

Dhananjay mude big decision : धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्र्याचा पदभार स्वीकारताच राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  • Dhananjay mude big decision : धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्र्याचा पदभार स्वीकारताच राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई –राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचे शुक्रवारी खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अंतर्गत खातेपालटही करण्यात आले आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खातं काढून घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना देण्यात आलं. मुंडे यांनी कृषी मंत्र्याचा पदभार स्वीकारताच राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai, Pune weather update : मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजयमुंडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर कृषी खात्याची जबाबदारी सोपवली आहे. शेतीचं आणि माझं वेगळं नातं आहे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करता येईल. त्याच अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली.

मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून यंदा पाऊसमानही कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील. सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र,आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.

 

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना दिली आहे. विमा योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच हवा. जर हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असेल तर कुणालाही नाराज व्हायचं कारण नाही.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या