मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maha Political Crisis: राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची तारीख अखेर ठरली

Maha Political Crisis: राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची तारीख अखेर ठरली

Aug 19, 2022, 08:27 AM IST

    • Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार ते महत्त्वाचे ठरेल. पुन्हा तारीख मिळणार, निकाल लागणार की प्रकरण मोठ्या पीठाकडे सोपवण्यात येणार हे पाहावं लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार ते महत्त्वाचे ठरेल. पुन्हा तारीख मिळणार, निकाल लागणार की प्रकरण मोठ्या पीठाकडे सोपवण्यात येणार हे पाहावं लागेल.

    • Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार ते महत्त्वाचे ठरेल. पुन्हा तारीख मिळणार, निकाल लागणार की प्रकरण मोठ्या पीठाकडे सोपवण्यात येणार हे पाहावं लागेल.

Maharashtra Political Crisis: राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सुटललेला नाहीय. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असलं तरी बंडखोर आमदारांच्या अपात्रेतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर याआधी दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता मात्र यावर सुनावणीची तारीख निश्चित झालीय. येत्या सोमवारी, २२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील संत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सहाव्या क्रमांकावर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी होईल. यावेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार ते महत्त्वाचे ठरेल. पुन्हा तारीख मिळणार, निकाल लागणार की प्रकरण मोठ्या पीठाकडे सोपवण्यात येणार हे पाहावं लागेल. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी संपणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

सर्वोच्च न्यायालयात एकीकडे सुनावणी लांबणीवर पडत आहे, त्यातच सरन्यायाधीश एनव्ही रमणा हे येत्या आठवड्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे खंडपीठ हेच राहणार की बदलणार? हा प्रश्न निर्माण झालाय. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडत आहेत. तर शिंदे गटाचे हरीश साळवे हे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाची बाजू अरविंद दातार मांडत आहेत.

याआधी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ३ ऑगस्टला सुनावणी झाली होती. तेव्हा बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा शिवसेना नेमकी कोणाची इथंपर्यंत पोहोचला होता. शिवसेना उद्धव ठाकरेंची की शिंदे गटाची असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या चिन्हावर काही निर्णय नको असं म्हटलं होतं. तसंच निवडणूक आयोगाने सुनावणी होईपर्यंत याबाबत कोणता निर्णय घेऊ नये असंही म्हटलं होतं.

सध्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राती सत्तासंघर्षाच्या एकूण ६ याचिका आहेत. या सर्व याचिका एकत्र करून घटनापीठाकडे सोपवण्यासाठी कुणीही विरोध केलेला नाही. त्यामुळे याचिका घटनापीठाकडे दिल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आता सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणाऱ्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढील बातम्या