मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मी CM पद सोडायला तयार, फक्त समोर येऊन सांगा; उद्धव ठाकरे यांचं भावनिक आवाहन

मी CM पद सोडायला तयार, फक्त समोर येऊन सांगा; उद्धव ठाकरे यांचं भावनिक आवाहन

Jun 22, 2022, 06:30 PM IST

    • Uddhav Thackeray's emotional Speech: शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार व शिवसैनिकांना भावनिक आवाहन करतानाच राजीनाम्याचीही तयारी दर्शवली आहे.
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray's emotional Speech: शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार व शिवसैनिकांना भावनिक आवाहन करतानाच राजीनाम्याचीही तयारी दर्शवली आहे.

    • Uddhav Thackeray's emotional Speech: शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार व शिवसैनिकांना भावनिक आवाहन करतानाच राजीनाम्याचीही तयारी दर्शवली आहे.

Uddhav Thackeray on Maharashtra Political Crisis: 'काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं माझ्यावर अविश्वास दाखवला असता तर मी समजू शकलो असतो. कारण ते वेगळे राजकीय पक्ष आहेत. पण माझ्याच लोकांनी माझ्यावर अविश्वास दाखवला हा माझ्यासाठी धक्का आहे. पण मी खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मी राजीनामा द्यायला तयार आहे. मात्र, माझ्या माणसांनी ही गोष्ट मला दूर जाऊन सांगण्याऐवजी माझ्याकडं येऊन सांगावी, असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

  • हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुख्यमंत्री असेन. मग ही शिवसेना कोणाची आहे? काही लोक म्हणतात की ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असं काय झालं की ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही?
  • २०१४ साली एकट्याच्या ताकदीवर व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं ६३ आमदार निवडून आले. त्यानंतरच्या सरकारमध्येही अनेक लोक मंत्री होते. मधल्या काळात लोकांना जे मिळालं, ते बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेनंच दिलं हे कृपा करून लक्षात असू द्या.
  • मला कशाचाही अनुभव नसताना माझ्यावर आलेली जबाबदारी मी जिद्दीनं पार पाडण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करणारच हा माझा निश्चय आहे. मधल्या काळात वेगळा राजकीय मार्ग धरावा लागला. त्याला काही कारणं होती. शरद पवार साहेब, सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. अनुभव नसलेला माणूस पदावर बसवणं यामागे स्वार्थ नसतो. राजकारण वळणाचं असावं पण त्यामागे कपट नसावं.
  • मला दु:ख, धक्का, आश्चर्य नक्कीच वाटलं आहे. कारण माझ्याच लोकांना मी नकोसा झालो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री म्हणून नको असतो तर ठीक होतं. कारण, ते वेगळे राजकीय पक्ष आहेत, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेन तर काय करावं?
  • माझ्याबद्दलची नाराजी तुम्ही समोर येऊन व्यक्त करा. उगाच ही शिवसेना आधीची शिवसेना राहिली नाही हे सगळं नको. त्यातून नुकसान कोणाचं होतंय हे लक्षात घ्या. मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर तसं सांगा. मी वर्षावरून लगेच मातोश्रीवर जातो.
  • ज्यांना माझ्यावर विश्वास नाही, त्यांनी माझ्याकडं यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांकडं स्वत: घेऊन जावं.
  • पदं येत असतात, जात असतात. त्या पदावर बसून तुम्ही काय केलं हे महत्त्वाचं. मी लोकांना कुटुंबातला एक वाटलो ही माझी कमाई आहे. तरीही मी या खुर्चीला चिकटून बसलेलो नाही. मी सोडायला तयार आहे. हे नाटक नाही.

पुढील बातम्या