मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain : बाप्पांसह वरुणराजाही घेणार अखेरचा निरोप?, पाहा हवामान अंदाज

Maharashtra Rain : बाप्पांसह वरुणराजाही घेणार अखेरचा निरोप?, पाहा हवामान अंदाज

Sep 30, 2023, 11:24 AM IST

    • maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे. त्यानंतर आता मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू झाला आहे.
maharashtra weather report in marathi (Hindustan Times)

maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे. त्यानंतर आता मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू झाला आहे.

    • maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे. त्यानंतर आता मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू झाला आहे.

maharashtra weather report in marathi : दोन आठवड्यांपासून राज्यातील कोकण, मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यंदाचा पावसाळा कोरडा गेल्यानंतर वरुणराजाने सप्टेंबर अखेरीस सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. परंतु उशीरा झालेल्या पावसामुळं खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सप्टेंबरच्या अखेरीस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता हवामान खात्याने पावसाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या पावसाच्या माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. गुजरात आणि राजस्थानमधून नैऋत्य मान्सून माघारी फिरला असून त्यामुळं अनेक ठिकाणी हवामानात बदल होत असल्याचं दिसून येत आहे. उत्तरेत मान्सूनच्या माघारीस अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावरही होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनचे वारे दाखल होत असतात. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून संपूर्ण भारतात सक्रिय होत असतो. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे वारे माघारी फिरत असतात. परंतु यावर्षी काहीसा उशिराने भारतात दाखल झालेला मान्सून लवकरच माघारी फिरणार असल्याचं चित्र आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागातून मान्सून परतण्यास सुरूवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील बातम्या