मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Monsoon: मुंबईकरांनो सावधान.. उद्या अतिवृष्टीचा इशारा, ८ जिल्ह्यांना ऑरेंज तर १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Monsoon: मुंबईकरांनो सावधान.. उद्या अतिवृष्टीचा इशारा, ८ जिल्ह्यांना ऑरेंज तर १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Jul 04, 2023, 08:24 PM IST

  • Maharashtra monsoon Update : ५ जुलैपासून पुढील ३ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुण्यातही पुढील ४ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra monsoon

Maharashtramonsoon Update : ५जुलैपासून पुढील३दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.पुण्यातही पुढील४दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

  • Maharashtra monsoon Update : ५ जुलैपासून पुढील ३ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुण्यातही पुढील ४ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी हवामान विभागाने (India Meteorological Department) ५ जुलैपासून ४ दिवस मुंबई, पुणे, कोल्हापूर,कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,५ जुलै रोजी मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पुढच्या २४ तासांत महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. तर रायगड, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

५जुलैपासून पुढील३दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.पुण्यातही पुढील४दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रात कोकण व घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात ५ ते ७जुलै तर मध्य महाराष्ट्रात ६ व ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे आणि ठाण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 

मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ जुलैपर्यंत उत्तर-दक्षिण कोकण,गोवा आणि पूर्व-पश्चिम विदर्भात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर घाटमाथावर पावसाचा जोर वाढणार असल्याचं म्हटलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या