मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain : मुठा नदीला पूर.. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली; वाहने अडकली, पाहा Video

Pune Rain : मुठा नदीला पूर.. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली; वाहने अडकली, पाहा Video

Aug 11, 2022, 09:35 PM IST

    • पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे पुण्यात मुठा नदीला पूर आला असून पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला असून अनेक वाहने अडकली आहेत.
पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे पुण्यात मुठा नदीला पूर आला असून पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला असून अनेक वाहने अडकली आहेत.

    • पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे पुण्यात मुठा नदीला पूर आला असून पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला असून अनेक वाहने अडकली आहेत.

पुणे – गेल्या तीन दिवसांपासून कोकण व विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे पुण्यात मुठा नदीला पूर आला असून पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला असून अनेक वाहने अडकली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं आहे. खडकवासाला धरणामध्ये पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून आज संध्याकाळी २६ हजार ८०९ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला. विशेष म्हणजे पूर आल्याने नदी पात्रातील भिडे पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग २००० क्युसेक्सवरून वाढवून ५००० क्युसेक्स करण्यात आलेला आहे.भाटघर धरण ९४.४१ टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने भाटघर पॉवर हाऊसमधून संध्याकाळी ६ वाजता १५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने नद्यांना पूर आला आहे. पाऊस अजूनही सुरुच आहे.

भिडे पुलावर अनेक गाड्या अडकल्याचे दिसून येत आहे. अनेकांकडून दोर बांधून वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचड हाल झाले. नदी पात्रात अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी चालकांची प्रचंड धावपळ झाली. दरम्यान नदी पात्रात पार्क केलेल्या काही गाड्या पाण्यात वाहून गेल्या.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या