मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यात मोकाट हत्तींचा लवकरच ‘बंदोबस्त’ होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

राज्यात मोकाट हत्तींचा लवकरच ‘बंदोबस्त’ होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

HT Marathi Desk HT Marathi

Jun 06, 2022, 07:50 PM IST

    • राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वन हत्तींची समस्या मोठी आहे. हत्तींचे कळप शेतीमध्ये घुसून शेतमालाचे अतोनात नुकसान करतात. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे.
Maharashtra government to take measures to tackle menace of wild elephants

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वन हत्तींची समस्या मोठी आहे. हत्तींचे कळप शेतीमध्ये घुसून शेतमालाचे अतोनात नुकसान करतात. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे.

    • राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वन हत्तींची समस्या मोठी आहे. हत्तींचे कळप शेतीमध्ये घुसून शेतमालाचे अतोनात नुकसान करतात. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वन हत्तींची समस्या मोठी आहे. हत्तींचे कळप शेतीमध्ये घुसून शेतमालाचे अतोनात नुकसान करतात. यावर तोडगा काढण्यासाठी आता सरकारी पातळीवर गांभीर्याने प्रयत्न सुरू आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी संपन्न झाली. बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

दोडामार्गातील वनहत्तींच्या समस्येवर तोडगा निघणार

यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच या परिसरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, तिलारी या परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

राज्यातील नवे १२ संवर्धन राखीव क्षेत्र

आज घोषित करण्यात आलेल्या १२ संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी (६६.०४ चौ.कि.मी), अलालदारी (१००.५६ चौ.कि.मी), नाशिक जिल्ह्यातील (चार) कळवण (८४.१२ चौ.कि.मी), मुरागड (४२.८७ चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (९६.९७ चौ.कि.मी), इगतपुरी (८८.४९९ चौ.कि.मी) रायगड जिल्ह्यातील (दोन) रायगड (४७.६२ चौ.कि.मी), रोहा (२७.३० चौ.कि.मी), पुणे जिल्ह्यातील भोर (२८.४४ चौ.कि.मी), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (१.०७ चौ.कि.मी ), कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (५.३४ चौ.कि.मी), नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (१०३.९२ चौ.कि.मी), यांचा समावेश आहे.

राज्यात नवीन ३ अभयारण्य क्षेत्र

मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रासह कोलामार्का आणि विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित

राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यास मान्यता या बैठकीत देण्यात आली. त्यामध्ये मयुरेश्वर – सुपे (५.१४५ चौ.किमी.), बोर (६१.६४), नवीर बोर (६०.६९), विस्तारित बोर (१६.३१), नरनाळा (१२.३५), लोणार वन्यजीव अभयारण्य (३.६५), गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८ चौ.कि.मी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (२२.३७), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (२९.९०), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (२.१७) यांचा समावेश आहे.

या बैठकीत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर,वाय एल पी राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पश्चिम मुंबई) क्लेमेंट बेन , संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज तसेच वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या