मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ..या कारणामुळे अखेर ठाकरे सरकारकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

..या कारणामुळे अखेर ठाकरे सरकारकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

May 13, 2022, 05:00 PM IST

    • राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

    • राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभा तसेच औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे व अजानबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्यातील राजकरण तापलं होतं. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.

..तर महाराष्ट्र पेटेल, मनसेचा इशारा -

बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बुधवारी दिली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला होता. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितले होतं.

बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, अजानबाबत तुम्ही जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असं पत्रात लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली होती. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत असं त्यांनी सांगितले होतं.

पुढील बातम्या