मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  legal notice to eknath shinde : हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांना नोटीस, असं काय म्हणाले मुख्यमंत्री?

legal notice to eknath shinde : हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांना नोटीस, असं काय म्हणाले मुख्यमंत्री?

Apr 12, 2024, 10:15 AM IST

  • Legal notice to Eknath Shinde: गुडीपाडव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोटे ऐतिहासिक दावे करून हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

हिंदूच्या भावना दुखावल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवण्यात आली.

Legal notice to Eknath Shinde: गुडीपाडव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोटे ऐतिहासिक दावे करून हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • Legal notice to Eknath Shinde: गुडीपाडव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोटे ऐतिहासिक दावे करून हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

Eknath Shinde News: हिंदूंच्या सणांची माहिती विकृत करणे आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतीच कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गुडीपाडवानिमित्त एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी खोटे ऐतिहासिक दावे केल्याच्या आरोपाखाली त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

Loksabha Election 2024 : ‘लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेतून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा’

गुढीपाडवा म्हणजे रावणावर प्रभू रामाच्या विजयाचा उत्सव आहे, असे शिंदे यांनी नुकतेच गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे पुण्यातील विधी महाविद्यालयातील सौरभ ठाकरे- पाटील आणि तेजस बैस या दोन विद्यार्थ्यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत त्यांना नोटीस पाठवली. उत्तरदायित्व आणि जबाबदाऱ्यांसह मुख्यमंत्रिपद भूषवूनही तुमच्या वक्तव्यातून तुम्हाला जबाबदारीची जाणीव नसल्याचे दिसून येते. तुम्ही अनेकदा निराधार, खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने करता, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

Pune OSHO Ashram : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा दणका, पुण्यातील आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली

'गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी ठाण्यातील एका कार्यक्रमात तुम्ही सांगितले होते की, रावणावर प्रभू रामाने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून आम्ही गुढीपाडवा साजरा करतो. हे विधान हास्यास्पद आहे, कारण शाळकरी मुलांनाही माहित आहे की आपण रावणावर प्रभू रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा करतो. गुढीपाडवा असल्याचा दावा करून तुम्ही हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. एकनाथ शिंदे हिंदुत्वनिष्ठ असल्याचा दावा करतात आणि तरीही त्यांना हिंदू संस्कृती आणि सणांची प्राथमिक माहिती नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात महादाजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे यांनी छत्रपती शिवरायांशी लढून प्राणांची आहुती दिली. पण शरणागती पत्करली नाही, असे म्हटले होते. महादाजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे यांचा जन्म शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक दशकांनंतर झाला होता, हे सर्वांना माहिती आहे. दत्ताजी शिंदे यांचा जन्म १७२३ मध्ये तर महादाजी शिंदे यांचा जन्म १७३० मध्ये झाला. तरीही तुम्ही ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केला. तुमच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांबद्दल तुम्ही सात दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या