मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maha Cabinet : अजितदादांच्या एन्ट्रीनं गणितं बदलली! अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना धक्का; मुंडे, तटकरेंचे वजन वाढले!

Maha Cabinet : अजितदादांच्या एन्ट्रीनं गणितं बदलली! अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना धक्का; मुंडे, तटकरेंचे वजन वाढले!

Jul 14, 2023, 05:44 PM IST

  • Setback to Shinde camp in cabinet portfolio distribution : राज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं असून त्यामुळं पूर्वीच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये मोठा बदल झाला आहे. एकनाथ शिंदे गटाला त्याचा फटका बसला आहे.

Maharashtra Cabinet Portfolio

Setback to Shinde camp in cabinet portfolio distribution : राज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं असून त्यामुळं पूर्वीच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये मोठा बदल झाला आहे. एकनाथ शिंदे गटाला त्याचा फटका बसला आहे.

  • Setback to Shinde camp in cabinet portfolio distribution : राज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं असून त्यामुळं पूर्वीच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये मोठा बदल झाला आहे. एकनाथ शिंदे गटाला त्याचा फटका बसला आहे.

Maharashtra Cabinet Portfolio Distribution : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांची खाती जाहीर करण्यात आली आहेत. नव्या मंत्र्यांना देण्यात आलेल्या खात्यामुळं जुन्या मंत्र्यांची खाती काही प्रमाणात बदलली असून त्यात सर्वात मोठा फटका शिंदे गटाला बसला आहे. तर, अजित पवार गटातील दोन तरुण मंत्र्यांना लॉटरी लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

एकनाथ शिंदे गट व भाजपच्या काही आमदारांच्या प्रखर विरोधानंतरही अर्थ खातं उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच देण्यात आलं आहे. त्याशिवाय, शिंदे यांच्या मंत्र्यांना काही खाती गमवावी लागली आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले अब्दुल सत्तार व संजय राठोड यांना महत्त्वाची खाती गमवावी लागली आहेत. अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं काढून घेण्यात आलं आहे. तर, संजय राठोड अन्न व औषध प्रशासन हे खातं काढून पवार गटाचे धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडं सोपवण्यात आलं आहे. 

अब्दुल सत्तार यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्यांच्यावर भ्रष्टाचार व फसवणुकीचे आरोपही झाले होते. संजय राठोड यांच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासन खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात ड्रगिस्ट असोसिएशननंच आघाडी उघडली होती. या साऱ्याचा फटका त्यांना बसला आहे.

अजित पवारांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले धनंजय मुंडे यांना कृषी खातं देण्यात आलं आहे. कृषी खातं हे अत्यंत महत्त्वाचं खातं समजलं जातं. धनंजय मुंडे यांच्याकडं हे खातं देऊन अजित पवारांनी त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. तर, आदिती तटकरे यांना महिला व बालविकास खातं देण्यात आलं आहे. आदिती तटकरे यांनी शपथ घेतल्यापासूनच शिंदे गटामध्ये अस्वस्थता होती. भरत गोगावले यांच्यासह रायगडमधील तिन्ही आमदारांनी आदिती तटकरे यांची तक्रार करतच मूळ पक्षाची साथ सोडली होती. त्यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळं या आमदारांची गोची झाली आहे. तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद दिलं जाऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. त्याबाबतचा निर्णय झाला नसला तरी पूर्वीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या आदिती तटकरे यांना अत्यंत महत्त्वाचं खातं देण्यात आलं आहे.

छगन भुजबळ यांच्याकडं आधीचंच खातं

अजित पवार गटाचे बडे नेते छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा हे खातं देण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्येही त्यांच्याकडं हेच खातं होतं. हे खातं पुन्हा घेण्यास भुजबळ इच्छुक नव्हते अशी चर्चा होती. मात्र, त्यांना तेच खातं देण्यात आलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या