मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Cabinet: धनगर समाज ते एअर इंडियाची इमारत; राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय

Maharashtra Cabinet: धनगर समाज ते एअर इंडियाची इमारत; राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय

Nov 08, 2023, 09:01 PM IST

    • Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.
Cm Eknath shinde

Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.

    • Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.

Maharashtra Cabinet Decision News In Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (८ नोव्हेंबर २०२३) राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी योजना प्रभाविपणे राबवण्यात येणार आहे. तसेच एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर इतर अनेक महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले.

Amit Shah: अपघातातून थोडक्यात बचावले गृहमंत्री!अमित शहा यांचा ताफा वीजांच्या तारांना धडकला

राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय

१) धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार येणार आहे. या योजनेसाठी शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार आहे.

२) राज्यातील निर्यातीला वेग देण्यात येणार . राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता.

३) मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.

४) अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार

५) मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.

६) गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार.

७) विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा.

८) मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार.

९) बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार.

१०) महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार.

११) नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात धनगर समाजाच्या उन्नतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे त्याचप्रमाणे शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्याबाबत नमूद केले होते.

पुढील बातम्या