मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cabinet Decisions : २३ महापालिकामंध्ये पीएम ई-बस सेवा, डॉक्टरांची वेतनवाढ; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Decisions : २३ महापालिकामंध्ये पीएम ई-बस सेवा, डॉक्टरांची वेतनवाढ; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Feb 25, 2024, 11:42 PM IST

  • Maharashtra Cabinate Decisions : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ईलेक्ट्रीक बसेस, निवास डॉक्टरांची वेतनवाढ, निरंतर वीज योजना आदि निर्णयांचा समावेश आहे.

Maharashtra Cabinate Decisions

Maharashtra Cabinate Decisions : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ईलेक्ट्रीक बसेस, निवास डॉक्टरांची वेतनवाढ, निरंतर वीज योजना आदि निर्णयांचा समावेश आहे.

  • Maharashtra Cabinate Decisions : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ईलेक्ट्रीक बसेस, निवास डॉक्टरांची वेतनवाढ, निरंतर वीज योजना आदि निर्णयांचा समावेश आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी २० हजार रुपये याप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  यामुळे खरीप हंगामासाठी १६०० कोटी रुपये खर्च येईल.

ट्रेंडिंग न्यूज

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय –

राज्यातील २३ महानगरपालिकामंध्ये पीएम ई-बस सेवा

राज्यात केंद्र पुरस्कृत “पीएम ई-बस सेवा” (PM e-Bus Sewa) योजनेची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

देशातील परिवहन सेवेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने व हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सक्षम व पर्यावरणपूरक शाश्वत उपाय योजनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिनांक १६ ऑगस्ट, २०२३ रोजी “पीएम ई-बस सेवा” (PM-eBus Sewa) ही योजना मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमार्फत १०,००० ई-बसेस देश भरात चालविण्याचे केंद्र शासनाचे उदिष्ट आहे.

ही योजना केंद्र शासनाने देशातील १६९ शहरामध्ये लागू केली असून यात FAME  योजनेंतर्गत समाविष्ट असलेली मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे वगळून राज्यातील २३ महानगरपालिकांचा समावेश आहे. 

धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण विद्यार्थी संख्या वाढविली

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  

राधानगरीचा सह्याद्री साखर कारखाना बीओटी तत्त्वावर -

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामोड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर 25 वर्षांकरिता चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जुने वीज टान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना

जुने टान्सफॉर्मर्स (रोहित्रे) बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ -

राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय. सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (कनिष्ठ आणि वरिष्ठ)  विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १ मार्च २०२४ पासून महागाई भत्त्यासह प्रति महिना १०  हजार रुपये वाढ करण्यात येईल.

वस्त्रोद्योग धोरणामध्ये वीज, सौर ऊर्जा अुनदानासाठी सुधारणा -

राज्यात यापुर्वी जाहीर केलेल्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ -

राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ  बैठकीत घेण्यात आला. 

हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या ७ हजार ६६ क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  यासाठी १५ कोटी ४८ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू -

राज्य शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार दिव्यांग जिल्हा समन्वयक, विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  याचा लाभ ६ दिव्यांग जिल्हा समन्वयक, ५२ विशेष तज्ज्ञ व १५८ विशेष शिक्षक अशा २१६कर्मचाऱ्यांना मिळेल.

नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल बालेवाडीप्रमाणे उभारणार -

नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल पुण्याच्या बालेवाडी प्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  या क्रीडा संकुलासाठी यापूर्वी ५१ कोटी २० लाख निधी देण्यात आला असून ६८३ कोटी ७९ लाखाचे सुधारित अंदाजपत्रक विचारात घेऊन ७४६ कोटी ९९ लाखाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.

अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फी मधून सूट -

अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या कोर्ट फी मधून कायम सूट देण्याचा निर्णय.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या