मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Free Treatment : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात आता मिळणार मोफत उपचार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Free Treatment : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात आता मिळणार मोफत उपचार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Aug 03, 2023, 07:08 PM IST

  • free treatment in government hospitals : राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Maharashtra cabinet meeting

free treatment in government hospitals : राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

  • free treatment in government hospitals : राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत या मुद्दा उपस्थित केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतआरोग्य खात्याशी संबंधित हा निर्णय घेण्यात आला आहे.सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात.

या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार करण्यासंदर्भात निर्णय हा एकमताने घेण्यात आला. यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी मोफत उपचार रुग्णांना मिळणार आहेत. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

 

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय कॅन्सर हॉस्पिटलया ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या