मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BJP: बाहेरून आलेल्यांना मानाची पदं, कार्यकर्ते मात्र उपेक्षित... माधव भांडारीच्या मुलानं भाजपला सुनावलं, पोस्ट व्हायरल

BJP: बाहेरून आलेल्यांना मानाची पदं, कार्यकर्ते मात्र उपेक्षित... माधव भांडारीच्या मुलानं भाजपला सुनावलं, पोस्ट व्हायरल

Feb 16, 2024, 12:25 AM IST

  • Maharashtra BJP : बाहेरून आलेल्या नेत्यांना मानाची पदे दिली जात असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. याची खदखद आता बाहेर पडत असून महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांचे पुत्र चिन्मय भांडारी यांची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे.

Madhav Bhandari

Maharashtra BJP : बाहेरून आलेल्या नेत्यांना मानाची पदे दिली जात असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. याची खदखद आता बाहेर पडत असून महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांचे पुत्र चिन्मय भांडारी यांची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे.

  • Maharashtra BJP : बाहेरून आलेल्या नेत्यांना मानाची पदे दिली जात असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. याची खदखद आता बाहेर पडत असून महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांचे पुत्र चिन्मय भांडारी यांची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे.

गेल्या काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अन्य पक्षातील नेते भाजपमध्ये सामील होत असून त्यांना पदे दिली जात आहे. राज्यसभेसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवार यादीत काँग्रेसमधून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यसभेची लॉटरी लागली. यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. याची खदखद आता बाहेर पडत असूनमहाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे पुत्र चिन्मय भांडारी (Chinmay Bhandari) यांची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे. यावेळी अगदी स्पष्ट शब्दात चिन्मय भांडारी यांनी आपल्या पोस्टमधून भाजपला सुनावलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

चिन्मय यांनी वडील माधव भांडारी यांचा राजकीय प्रवास सांगत त्यांनी जनसंघपासून ते अगदी २०१४ पर्यंत त्यांनी भाजपसाठी केलेल्या कार्याच्या यादीच दिली आहे. चिन्मय यांनी म्हटले की, ही माझी वैयक्तीक पोस्ट असून यातील मांडलेले विचार माझे वैयक्तिक आहेत.

त्यांनी लिहिले की, माझे वडील १९७५ मध्ये जनसंघात सामील झाले त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. याला आता जवळपास ५० वर्षे होत आली आहेत. यूपीए सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांविरोधात २००८ ते २०१४ या काळात सरकारविरोधात जोरदार आवाज उठवला. त्यांच्यासोबत आणखीही काही नेते होते. मात्र या काळात माधव भांडारी यांनी पक्षासाठी जीव तोडून काम केले.

या ५० वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात व विविध भूमिकांमधून संघटना बळकट करण्यासाठी काम केले आहे. त्यांनी हजारो लोकांना व शेकडो लोकांना मदत केली आहे.

माझ्या आयुष्यात १२ वेळा माधव भांडारी यांचं नाव कधी विधानसभेसाठी तसेच वरिष्ठ सभागृहासाठी चर्चेत राहिले मात्र शेवटपर्यंत त्यांचे नाव कधीफायनल झाले नाही. मी नेतृत्वाला प्रश्न विचारण्याच्या किंवा न्याय मागण्याच्या कोणत्याही स्थितीत नाही. मला ते करायचंही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणे माझाही त्यांच्या विचारधारेवर विश्वास आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या