मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Winter Session : कोयना धरणाचे पाणी कृष्णा नदीत सोडा; जयंत पाटील यांची मागणी

Nagpur Winter Session : कोयना धरणाचे पाणी कृष्णा नदीत सोडा; जयंत पाटील यांची मागणी

Dec 14, 2023, 04:31 PM IST

  • Jayant Patil on Koyna Dam Water : सांगली जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन कोयना धरणातील पाणी कृष्णा नदीत सोडा, अशी मागणी जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली.

Jayant Patil

Jayant Patil on Koyna Dam Water : सांगली जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन कोयना धरणातील पाणी कृष्णा नदीत सोडा, अशी मागणी जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली.

  • Jayant Patil on Koyna Dam Water : सांगली जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन कोयना धरणातील पाणी कृष्णा नदीत सोडा, अशी मागणी जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली.

Jayan patil on koyna dam water : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यामुळं निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहाचं लक्ष वेधलं. कोयना धरणाचं पाणी लवकरात लवकर कृष्णा नदीत सोडण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

लक्षवेधी सूचनेद्वारे जयंत पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. 'कोयनेतून पाणी कमी आल्यानं कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळं ताकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे हक्काचे ३२ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणं व कृष्णा नदी कोरडी न पडू देणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोरच एकाने संपवले जीवन

'जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध विधानं करत आहेत. खासदारांनी तर राजीनामा देतो असं विधान केलं. या राजकीय दबावामुळं पाणी सोडलं जात नाही असा समज झाला. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांमध्ये समन्वय नाही किंवा संवाद नाही नसल्याकडं जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं.

'अवघ्या २ ते ३ टीएमसी पाण्यासाठी ३२ टीएमसी पाण्यावर अन्याय करणं योग्य नाही. धरणात पाणीच नाही अशी परिस्थिती नाही. ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून या खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या भागात पाणी जातं. या काळात पाणी दिलं तर उन्हाळ्यात त्रास होत नाही. पाणी सोडलं तर या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. कृष्णा नदीत पाणीसाठा राहील. एप्रिल - मे महिन्यात आमच्या जिल्ह्यात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होतो. याच काळात कोकणात वीजनिर्मितीसाठी पाणी सोडलं जातं. ही वीजनिर्मिती थोडीशी कमी करून पाणी सांगली जिल्ह्याकडं वळवावं, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या