मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Result : एमपीएससीकडून महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

MPSC Result : एमपीएससीकडून महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर

Jul 12, 2023, 10:41 PM IST

  • Agricultural Service Main Exam Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

Mpsc

Agricultural Service Main Exam Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१चा निकाल जाहीर करण्यात आलाआहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

  • Agricultural Service Main Exam Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

MPSC exam Result 2021 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१चा निकाल जाहीर करण्यात आलाआहे. कृषी सेवा परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील नीलेश देशमुख राज्यात पहिला आला असून गोंदिया जिल्ह्यातील धर्मेंद्र गिऱ्हेपुंजे मागास प्रवर्गातील पहिला तर पुणे जिल्ह्यातील भारती गावडे महिला वर्गातून राज्यात पहिली आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Couple Suicide: मुंबईच्या कांदिवलीत नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Pune Porsche car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा थरकाप उडवणारा video व्हायरल, पाहा!

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १० ते १३ एप्रिल २०२३ या दरम्यान महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या आधारावर प्रस्तूत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे पात्रता गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांनी गुणपत्रके त्यांच्या ऑनलाइन खात्यात पाठवल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत एमपीएससीकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.

आरोग्य विभागाच्या भरतीसाठी स्वतंत्र यंत्रणा -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यानुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

अ आणि ब गटाच्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून घेतल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. अधिक्षक, डॉक्टर अशा मोठ्या पदांचा यामध्ये समावेश आहे. असे असताना आरोग्य विभागातील क आणि ड गटाच्या परीक्षा या नियमित होतात तशाच असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या