मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharahtra Rain : पुढील २४ तास महत्वाचे.. 'आषाढी' च्या दिवशी राज्यात अतिवृष्टीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharahtra Rain : पुढील २४ तास महत्वाचे.. 'आषाढी' च्या दिवशी राज्यात अतिवृष्टीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Jun 28, 2023, 09:22 PM IST

  • Maharahtra monsoon update : हवामान खात्याने उद्या म्हणजेच २९ जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Maharahtra Rain

Maharahtra monsoon update : हवामान खात्याने उद्या म्हणजेच२९जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे,त्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

  • Maharahtra monsoon update : हवामान खात्याने उद्या म्हणजेच २९ जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Heavy Rain : राज्यात यंदा मान्सूनने उशिराने एंट्री केली असली तरी मागील दोन दिवसापासून मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार बरसला आहे. पावसाचा जोर वाढत असून मुंबई, पुण्यासह कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावलाअसला तरी अनेक ठिकाणांहून पडझडीच्या बातम्या येत आहेत. त्यातच आता येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

हवामान खात्याने उद्या म्हणजेच२९जूनला ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने शुक्रवारी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.त्यामुळे या भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला असून अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

 

जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं होतं.ठाण्यातही मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलंअसून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या