मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kirit Somaiya Viral Video : पेन ड्राइव्ह घेऊनच सभागृहात जातोय; अंबादास दानवे यांचा किरीट सोमय्यांना कडक इशारा

Kirit Somaiya Viral Video : पेन ड्राइव्ह घेऊनच सभागृहात जातोय; अंबादास दानवे यांचा किरीट सोमय्यांना कडक इशारा

Jul 18, 2023, 12:55 PM IST

    • Kirit Somaiya Viral Video : भाजपा नेते किरीट सोमय्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
Ambadas danve vs kirit somaiya (HT)

Kirit Somaiya Viral Video : भाजपा नेते किरीट सोमय्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

    • Kirit Somaiya Viral Video : भाजपा नेते किरीट सोमय्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

Kirit Somaiya Viral Video News : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्यांच्या अश्लील कृत्याचा पर्दापाश केला आहे. त्यानंतर आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. किरीट सोमय्या यांचे एक नाही तर अनेक व्हिडिओ असल्याचे दावे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या व्हिडिओंचे पेनड्राईव्ह घेऊन सभागृहात येत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळं आता यावरून भाजप आणि ठाकरे गटात वादंग माजण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, किरीट सोमय्या, नागडा तर तू झालेलाच आहे. राहिलं साहिलं आज करतो. मी पेनड्राईव्ह घेऊन येतोय. भेटुया, सभागृहात. असं म्हणत अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांचे आणखी व्हिडिओ पोस्ट करण्याचे संकेत दिले आहे.

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह घेऊन येत असल्याचा इशारा दिल्याने विधानपरिषदेत मोठा राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी संध्याकाळी राज्यातील एका मराठी वृत्तवाहिनीने भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या एका अश्लील व्हिडिओचा खुलासा केला होता. त्यानंतर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी भाजपा तसेच किरीट सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी 'आपण कुठल्याच महिलेवर अत्याचार केलेला' नसल्याचं सांगत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. सोमय्या यांनी चौकशीच्या मागणीचं पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. त्यामुळं आता किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील बातम्या