मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lokshahi News Marathi : किरीट सोमय्यांबद्दल बातमी देणाऱ्या वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण काही काळ बंद, चर्चेला उधाण

Lokshahi News Marathi : किरीट सोमय्यांबद्दल बातमी देणाऱ्या वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण काही काळ बंद, चर्चेला उधाण

Jul 19, 2023, 02:44 PM IST

    • Lokshahi Marathi News Channel : लोकशाही मराठी न्यूज चँनलचं प्रक्षेपण काही काळासाठी अचानक बंद झालं होतं. परंतु आता वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
lokshahi news kirit somaiya video (HT)

Lokshahi Marathi News Channel : लोकशाही मराठी न्यूज चँनलचं प्रक्षेपण काही काळासाठी अचानक बंद झालं होतं. परंतु आता वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

    • Lokshahi Marathi News Channel : लोकशाही मराठी न्यूज चँनलचं प्रक्षेपण काही काळासाठी अचानक बंद झालं होतं. परंतु आता वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

lokshahi news kirit somaiya video : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील अश्लील व्हिडिओची बातमी प्रसारीत करणाऱ्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं प्रसारण आज अचानक बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार यांनी ट्वीट करत प्रक्षेपण बंद झाल्याची माहिती दिली आहे. 'काही तांत्रिक अडचणींमुळे लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण गेल्या काही तासांपासून बंद' असल्याचं संपादक कमलेश सुतार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच लोकशाही चँनलची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असंही सुतार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील अश्लील व्हिडिओ प्रकरणाची बातमी लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारीत करण्यात आली होती. त्यानंतर किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आक्षेप नोंदवत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता लोकशाहीने सोमय्यांवरील व्हिडिओची बातमी देऊन काही तास होत नाही तर लोकशाहीचं प्रक्षेपण बंद झालं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, प्रक्षेपण बंद झाल्यानंतर काही तासांत लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं लाईव्ह प्रसारण सुरू झालं आहे.

लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी तांत्रिक बिघाड झाल्यामुळं प्रक्षेपण बंद झाल्याचं म्हटलं आहे. परंतु आता या प्रकरणाला राजकीय किनार असल्याने त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

व्हायरल व्हिडिओची चौकशी होणार- गृहमंत्री फडणवीस

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन सुरू असताना प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. परंतु विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. तसेच दानवे यांनी किरीट सोमय्या यांचे आठ तासांचे व्हिडिओ असल्याचा दावा करत त्यासंदर्भातील पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सोपवला होता.

पुढील बातम्या