मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train : पनवेल-बेलापूर, अंबरनाथ-बदलापूर लोकल सेवा ठप्प; सीएसटीकडे जाणारे प्रवासी अडकले

Mumbai Local Train : पनवेल-बेलापूर, अंबरनाथ-बदलापूर लोकल सेवा ठप्प; सीएसटीकडे जाणारे प्रवासी अडकले

Jul 19, 2023, 11:59 AM IST

    • panvel belapur local train : पनवेल-बेलापूर आणि बदलापूर-अंबरनाथ रेल्वेसेवा ठप्प झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
local train services disrupted on panvel belapur route (HT)

panvel belapur local train : पनवेल-बेलापूर आणि बदलापूर-अंबरनाथ रेल्वेसेवा ठप्प झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

    • panvel belapur local train : पनवेल-बेलापूर आणि बदलापूर-अंबरनाथ रेल्वेसेवा ठप्प झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

local train services disrupted on panvel belapur route : पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी साडेनऊ वाजेपासून पनवेल-बेलापूर लोकल मार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून कामावर जाणारे अनेक प्रवासी अडकून पडले आहे. दुसरीकडे अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता मुंबईत रात्रीपासून पाऊस होत असतानाच लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील हार्बर मार्गावर पनवेल स्थानकात पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलहून बेलापुरच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक खोळंबली आहे. तर अंबरनाथहून बदलापुरकडे जाणारी रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळं सीएसटीकडे येणाऱ्या प्रवाशांना कामासाठी जाण्यास उशीर होत आहे. त्यामुळं अनेक प्रवाशांना रेल्वे सोडून सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. रात्री उशीरापासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी लोकल सेवा ठप्प झाली असून काही गाड्या १५ ते २० मिनिटांच्या उशीराने धावत असल्याची माहिती आहे.

पनवेल रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समजताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वे ठप्प झाल्या आहे. त्यामुळं कामावर जाणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला आहे. त्यानंतर आता पनवेल-बेलापूर लोकल सेवा येत्या काही तासांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच रुळांवरील पाणी कमी झाल्यानंतर अंबरनाथ-बदलापूर लोकल सेवा सुरू केली जाणार आहे.

पुढील बातम्या