मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सदावर्तेंना सहकार खात्याचा धक्का! ST बँकेच्या संचालक पदावरून निकटवर्तीयाची हकालपट्टी

सदावर्तेंना सहकार खात्याचा धक्का! ST बँकेच्या संचालक पदावरून निकटवर्तीयाची हकालपट्टी

Dec 28, 2023, 03:40 PM IST

  • Gunaratna Sadavarte News : एसटी को- ऑपरेटीव्ह बॅंकेच्या   व्यवस्थापकीय संचालक पदावरुन सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या संबंधीचे आदेश पुणे सहकार आयुक्तांनी दिले आहेत.

gunaratna sadavarte

Gunaratna Sadavarte News : एसटी को- ऑपरेटीव्ह बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या संबंधीचे आदेश पुणे सहकार आयुक्तांनी दिले आहेत.

  • Gunaratna Sadavarte News : एसटी को- ऑपरेटीव्ह बॅंकेच्या   व्यवस्थापकीय संचालक पदावरुन सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या संबंधीचे आदेश पुणे सहकार आयुक्तांनी दिले आहेत.

Gunaratna Sadavarte: गेल्या काही दिवसांपासून संचालकपदाच्या अपात्रतेवरून एसटी बँकेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या (ST BANK) संचालक पदावर सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सौरभ पाटील हे वकील गुणरत्न सदावर्ते यांचे निकटवर्तीय मानले जातात. सहकार खात्याच्या या कारवाईने सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. सौरभ पाटील यांची नियुक्ती अवैध असल्याचे सांगत सहकार आयुक्तांनी त्यांना संचालकपदावरून हटवण्याचे आदेश बँकेला दिले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

सौरभ पाटील यांच्या संचालकपदी केलेल्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. सौरभ पाटील यांना बँकिग क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नाही. तसेच या पदासाठी आवश्यक असलेली अट म्हणजे वयाची ३५ वर्ष पुर्ण झालेली व्यक्तीच संचालकपदी विराजमान होऊ शकते. ही अट सौरभ पाटील पूर्ण करत नाहीत. यामुळे एसटी को- ऑपरेटीव्ह बॅंकेच्या  व्यवस्थापकीय संचालक पदावरुन सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या संबंधीचे आदेश पुणे सहकार आयुक्तांनी दिले आहेत. कलम ७९अन्वये सौरभ पाटील यांच्यावर ही कारवाई केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर पार पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळवला होता. त्यानंतर सदावर्ते यांचा नातेवाईक असलेल्या सौरभ पाटील यांची बँकेच्या  व्यवस्थापकीय  संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. संचालकपदासाठी आरबीआयकडून ३५ वर्ष वयाची आणि किमान आठ वर्ष अनुभवाची अट असताना २५ वर्षीय पाटील यांना कोणताही अनुभव नसताना संचालक केलं गेलं. यामुळे सुरुवातीपासूनच ही निवड वादात सापडली होती. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा आक्रमकपणे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.

दरम्यान, याआधीही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी बँकेत साडेचारशे कोटींचा घोटाळ्याचा  आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध बँकेच्या संचालकांनी बंड केले असून १४ संचालक राजीनामा देणार असल्याच्याही चर्चा समोर आल्या होत्या.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या