मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड; जरांगेंच्या अटकेची मागणी

Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड; जरांगेंच्या अटकेची मागणी

Oct 26, 2023, 10:20 AM IST

  • Gunaratna Sadavarte car attack : मराठा आरक्षणाविरोधात बोलल्याने मध्यरात्री गुणरत्न सदावर्तेंच्या यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

Gunaratna Sadavarte Car Vandalized

Gunaratna Sadavarte car attack : मराठा आरक्षणाविरोधात बोलल्याने मध्यरात्री गुणरत्न सदावर्तेंच्या यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

  • Gunaratna Sadavarte car attack : मराठा आरक्षणाविरोधात बोलल्याने मध्यरात्री गुणरत्न सदावर्तेंच्या यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

Gunaratna Sadavarte Car Vandalized: मराठा आरक्षणाविरोधात बोलल्यानाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात सदावर्ते यांच्या गाडीची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून यात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील फुलंब्री गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Beed accident: बीडमध्ये दोन भीषण अपघातात १० जण ठार; मध्यरात्री आणि पहाटे घडल्या घटना

सदावर्तेंच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या घराबाहेर आज सकाळी त्यांची गाडी उभी होती. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर तोडफोड करणारे फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे.

US shooting news : अमेरिका हादरली! लेविस्टन शहरात अंदाधुंद गोळीबारात २२ ठार; ६० हून अधिक जखमी

दरम्यान, सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते म्हणाले, मला वारंवार धमक्या येत आहेत तसेच जीवे मारण्याची धकमी दिली जात आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले होते. यामुळे तेव्हापासूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष आहे. याचेच पडसाद हे आज उमटले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घराबाहेर उपोषण देखील केले होते. त्यानंतर आज ही घटना घडली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या