मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लातूरमध्ये उसाच्या ट्रक्टरची डिझेल टँकरला धडक, सात वाहने जळाली

लातूरमध्ये उसाच्या ट्रक्टरची डिझेल टँकरला धडक, सात वाहने जळाली

Nov 24, 2022, 09:32 AM IST

    • उसाच्या ट्रॅक्टरने डिझेलने भरलेल्या टँकरला धडक दिली. यानंतर डिझेल टँकरला आग लागली आणि आगीने रौद्र रुप धारण केलं.
लातुरमध्ये उसाच्या ट्रक्टरची डिझेल टँकरला धडक, सात वाहने जळाली

उसाच्या ट्रॅक्टरने डिझेलने भरलेल्या टँकरला धडक दिली. यानंतर डिझेल टँकरला आग लागली आणि आगीने रौद्र रुप धारण केलं.

    • उसाच्या ट्रॅक्टरने डिझेलने भरलेल्या टँकरला धडक दिली. यानंतर डिझेल टँकरला आग लागली आणि आगीने रौद्र रुप धारण केलं.

लातुरमध्ये उसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर आग भडकली आणि यामध्ये सात वाहने जळून खाक झाली आहेत. अपघतात कोणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडले याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. या घटनेनंतर लातुर-उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद केली असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भातखेडा इथल्या मांजरा नदीच्या पुलाच्या पुढे उसाच्या ट्रॅक्टरने डिझेलने भरलेल्या टँकरला धडक दिली. यानंतर डिझेल टँकरला आग लागली आणि आगीने रौद्र रुप धारण केलं. यामध्ये सात वाहने जळून खाक झाली आहेत. या अपघातानंतर पाच पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली.

रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने वळण रस्त्यावरून वाहतूक वळवली आहे. तिथेच हा अपघात झाला आहे. अरुंद रस्ता असल्याने एकापाठोपाठ आलेली वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जळून खाक झालेल्या वाहनांमध्ये उसाचा ट्रॅक्टर, डिझेल टँकर, दोन कार, कापूस वाहतूक करणारा ट्रक, एसटी बस आणि ट्रॉली नसलेला ट्रॅक्टर यांचा समावेश आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या