मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाची वैभवी मिरवणूक; तब्बल २२ तासांनी झाले विसर्जन

Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाची वैभवी मिरवणूक; तब्बल २२ तासांनी झाले विसर्जन

Sep 29, 2023, 10:26 AM IST

    • Lalbaugcha Raja 2023 Visarjan : नवसाला पावणारा अशी ओळख असणाऱ्या लालबागचा राजा गणपतीचे तब्बल २२ तास चाललेल्या वैभवी मिरवणुकीनंतर आज विसर्जन करण्यात आले.
Lalbaugcha raja visarjan

Lalbaugcha Raja 2023 Visarjan : नवसाला पावणारा अशी ओळख असणाऱ्या लालबागचा राजा गणपतीचे तब्बल २२ तास चाललेल्या वैभवी मिरवणुकीनंतर आज विसर्जन करण्यात आले.

    • Lalbaugcha Raja 2023 Visarjan : नवसाला पावणारा अशी ओळख असणाऱ्या लालबागचा राजा गणपतीचे तब्बल २२ तास चाललेल्या वैभवी मिरवणुकीनंतर आज विसर्जन करण्यात आले.

मुंबई: ढोलताशांचा गजर, बाप्पा बाप्पा मोरयाचा जयघोष तसेच विविध वाद्यांच्या तालावर नाचत गात नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा गणपतीची वैभवी मिरवणूक तब्बल २२ तास चालली. आज सकाळी ९.१५ मिनिटांनी यंदाचे वर्ष चांगले जाऊ दे अशी भावनिक साद घालत गणारायाला निरोप देण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Maharashtra weather update: राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

मुंबईत गेले १० दिवस जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाची मिरवणूक गुरुवारी सकाळी ११.३० वाजता निघाली. वैभवी रथात मूर्ती विराजमान करून ती विसर्जन मार्गाने पुढे निघाली. लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते.

Pune Rain: मुळधार पावसाने पुणे तुंबले; रस्त्यावर साचले गुडघाभर पाणी; पाहा फोटो

विसर्जन मिरवणुकीत ढोलताशा पथक, विविध वाद्य पथक सहभागी झाले होते. दरम्यान, विसर्जन सोहण्यात देखील हजारो नागरीक सहभागी झाले होते. काल भर पावसात मिरवणुकीचा आनंद मुंबईकरांनी घेतला. विसर्जन मिरवणूक मार्गात अनेक ठिकाणी गणपती राजाचे स्वागत करण्यात आले होते. काही चौकात क्रेनच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तर ठिकाणी आरती करण्यात आली. हा सोहळा विसर्जनासाठी गिरगावच्या चौपाटीकडे जात होता. मात्र, समुद्रात ओहोटी असल्याने विसर्जनासाठी आलेले अनेक मंडळे ही रांगेतच उभे होते, त्यामुळे ही विसर्जन लांबले. आज सकाळी भरती आल्यावर विसर्जनाची तयारी करण्यात आली. मोठ्या लाकडी तराफ्यावर मूर्ती विरजमान करण्यात आली. यानंतर दोन मोठ्या बोटींच्या साह्याने लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्यासाठी समुद्रात नेण्यात आले. यावेळी कोळी बांधवांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आरती करण्यात आली. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात आज सकाळी ९.१५ मिनिटांनी लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा तगडा बंदोबस्त ठेवला होता.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या