मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajaram Election Result : अखेर कंडका पडला..! सतेज पाटलांना मोठा धक्का, 'राजाराम'मध्ये महादेव महाडिकांचे वर्चस्व कायम

Rajaram Election Result : अखेर कंडका पडला..! सतेज पाटलांना मोठा धक्का, 'राजाराम'मध्ये महादेव महाडिकांचे वर्चस्व कायम

Apr 25, 2023, 03:57 PM IST

  • Rajarama Suger Factory Election : महाडिक गटाकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. यंदा कंडका पाडायचा अशी टॅगलाईन करत सतेज पाटलांकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली होती.

Rajarama Suger Factory Election

RajaramaSugerFactoryElection : महाडिक गटाकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. यंदा कंडका पाडायचा अशी टॅगलाईन करत सतेज पाटलांकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली होती.

  • Rajarama Suger Factory Election : महाडिक गटाकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. यंदा कंडका पाडायचा अशी टॅगलाईन करत सतेज पाटलांकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली होती.

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहिले आहे. या निवडणुकीसाठी सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. या कारखान्यावर मागील २८ वर्षापासून महाडिक गटाचे वर्चस्व आहे. महाडिक गटाकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. यंदा कंडका पाडायचा अशी टॅगलाईन करत सतेज पाटलांकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली होती. या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेस गटनेते आणि आमदार सतेज पाटील हे आमने-सामने आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चुरस पाहायला मिळणार आहे. या साखर कारखाना निवडणुकीसाठी ९१.१२ टक्के इतकं चुरशीने मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह एकूण ४४ उमेदवार रिंगणात आहेत.

मात्र राजाराम कारखान्याच्या मतमोजणीतील पाच फेऱ्यांअखेर महाडिकांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. याबरोबरच संस्था गटातून महादेवराव महाडिक यांनी ८४ मते मिळवत आपला विजय निश्चित केला आहे. राजाराम कारखान्यातील पराभव हा सतेज पाटील यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

राजारामच्या निवडणुकीसाठी मागील एक महिन्यापासून प्रसार सभांचा धडाका सुरू होता. आज कोल्हापूर येथील रमण मळा येथे या कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत सत्ताधारी महाडिक गटाने ७०० मतांची आघाडी घेतली आहे.

 

छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीतील सुरुवातीच्या कलानुसार माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस होती. मात्र त्यानंतर महाडिक गटाने वर्चस्व मिळवलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या