मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह Video व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ, विरोधकांकडून चौकशीची मागणी

Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह Video व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ, विरोधकांकडून चौकशीची मागणी

Jul 17, 2023, 11:33 PM IST

  • Kirit somaiyas offensive video : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी सोमय्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

Kirit somaiya

Kiritsomaiyasoffensivevideo : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी सोमय्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

  • Kirit somaiyas offensive video : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी सोमय्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

माजी खासदार व भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडिओ एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसून येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली असून विरोधकांकडून भाजप व सोमय्यावर टीकेटी झोड उठवण्यात येत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे – अंबादास दानवे

या घटना कुठे झाल्या, कशा झाल्या. आता याबाबत गृहमंत्रालयाने याविषयी चौकशी केली पाहिजे. आता सगळ्या विषयात साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे..’

‘असं ऐकतो आहे की,त्यांच्याविरोधात अनेक महिलांनी तक्रार केले आहेत. माझे पंतप्रधान, गृहमंत्री ईडी यांच्याशी माझे फार जवळचे संबंध आहेत. ते सगळे माझ्या तालावर नाचतात.. म्हणून काही लोकांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारीसुद्धा काही ठिकाणी आल्या आहेत.. असं माझ्या कानावर आलं आहे.’ अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

 

दुसऱ्यांवर चिखल उडविणारे सोमय्या चिखलामध्ये लोळताहेत - विद्या चव्हाण

किरीट सोमय्या यांच्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहे. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतील तर दुसऱ्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

व्हिडिओची शहनिशा करुन कारवाई होणं गरजेचं - रुपाली ठोंबरे-पाटील

रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या की,हा व्हिडीओ खरं की खोटं तपासून कारवाई होणे गरजंचं आहे. लोकप्रतिनिधीचं अशा पध्दतीने व्हिडीओ येणं हे अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहेत. किरीट सोमय्या प्रसिध्द व्यक्ती आहे. त्यांनी अनेक भ्रष्ट्राचार काढले आहेत. अशा पध्दतीचे व्हिडीओ येत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पहिजे असं माझं मत आहे. या व्हिडीओची याची शहनिशा करुन कारवाई होणं गरजेचे आहे.

किळस’ वाण्या सोमय्यांची चौकशी झालीच पाहिजे- यशोमती ठाकूर

मराठी वृत्तवाहिनीनं भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ चॅट सर्वांसमोर आणल्याबद्दल त्यांचे आभार. अनेक नेत्यांवर तथ्यहीन आरोप करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमय्यांचा खरा चेहरा यानिमित्तानं सर्वांसमोर आलाय. आता या चॅनेलच्या पाठिशी राहणं ही लोकशाही मानणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे. नाहीतर या चॅनेलवरही ईडी,सीबीआय सारख्या संस्थांच्या धाडी पाडल्या जातील किंवा मागच्या दारातून हे चॅनेलही विकत घेतलं जाईलही. मात्र,कोंबडं झाकून ठेवलं तरी आरवायचं राहत नाही. त्यामुळं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला गेला तरी भाजपमधले ‘किळस’ वाणे सोमय्या बाहेर येतच राहणार...

नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजप च्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलीय.अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

हिसाब देना पडेगा –सचिन सावंत

किरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर आरोप करतात, दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात,चारित्र्यहानन करत असतात. सुपारी घेतल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असावं का अशी शंका येते. अशा पध्दतीचं वर्तन त्यांच्याकडून येत तर ते अधिक अधोरेखित होते. ही एक विकृत प्रवृत्ती आहे. हिसाब देना पडेगा, चारित्र्यशुध्द व्यक्तिमत्व आहे की नाही हे जनता ऑडिट करेल,असे सचिन सावंतांनी म्हंटले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या