मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nana Patole : दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचंच आज वस्त्रहरण झालं; काँग्रेसनं सोमय्यांसह भाजपलाही घेरलं

Nana Patole : दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचंच आज वस्त्रहरण झालं; काँग्रेसनं सोमय्यांसह भाजपलाही घेरलं

Jul 18, 2023, 04:14 PM IST

  • Nana Patole on Kirit Somaiya viral Video : किरीट सोमय्यांच्या अश्लील व्हिडिओच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

Nana Patole - Kirit Somaiya

Nana Patole on Kirit Somaiya viral Video : किरीट सोमय्यांच्या अश्लील व्हिडिओच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

  • Nana Patole on Kirit Somaiya viral Video : किरीट सोमय्यांच्या अश्लील व्हिडिओच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

Kirit Somaiya viral Video : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांचे अश्लील व्हिडिओ चव्हाट्यावर आल्यापासून विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपच्या विरोधकांवर बेछूट आरोप करून ईडी-सीबीआयकडं त्यांच्या तक्रारी करणाऱ्या सोमय्यांना सर्वच पक्षांनी घेरलं आहे. ‘दुसऱ्यांचं वस्त्रहरण करणाऱ्याचंच आज वस्त्रहरण झालं आहे,’ अशी बोचरी टीका काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओंचा पेनड्राइव्ह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभापतींकडं दिला. त्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना घेरलं आहे. नाना पटोले यांनीही ही संधी साधत भाजपवरही सडकून टीका केली आहे. विधान भवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते.

'भाजपनं मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचं पाप केलं आहे. किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका खासगी वृत्तवाहिनीनं दाखवलेला आहे. तो आम्ही अद्याप पाहिलेला नाही. तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणं योग्य होईल. परंतु दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचं आज वस्त्रहरण झालं आहे, असा टोला पटोले यांनी हाणला.

भाजपनं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?

'देवेंद्र फडणवीसांचं सरकार २०१४ साली महाराष्ट्रात आलं, तेव्हापासून राज्यातील वातावरण घाणेरडं झालं आहे. राजकारणाच स्तर घसरत चालला आहे. राज्यात सीबीआय, ईडी, आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून ब्लॅकमेल करण्याचे उद्योग सुरू आहेत. भाजपनं कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? असा परिस्थिती झाली आहे. जे दुसऱ्यांच्या घरांना आग लावायला गेले, ते स्वत:च त्यात होरपळले, असं पटोले म्हणाले.

'किरीट सोमय्यांचा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महागाई, शेतकरी, महिला, कायदा सुव्यवस्था, तरुणांचे प्रश्न आहेत. महागाई गगनाला भिडली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, सरकार विधानसभेत घोषणा करते, पण मदत मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचं आहे, असं पटोले म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या