मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कन्नडिगांची मुजोरी सुरूच.. १ नोव्हेंबर काळ्या दिनी महाराष्ट्रातील ३ मंत्री व खासदाराला प्रवेशबंदी

कन्नडिगांची मुजोरी सुरूच.. १ नोव्हेंबर काळ्या दिनी महाराष्ट्रातील ३ मंत्री व खासदाराला प्रवेशबंदी

Oct 31, 2023, 11:20 PM IST

  • Maharashtra minister entry ban in belagavi : १ नोव्हेंबर रोजी बेळगावात काळा दिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित महाराष्ट्रातील तीन मंत्री व एका खासदाराला प्रवेशबंदी केली आहे.

संग्रहित छायाचित्र

Maharashtra minister entry ban in belagavi : १ नोव्हेंबर रोजी बेळगावात काळा दिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित महाराष्ट्रातील तीन मंत्री व एका खासदाराला प्रवेशबंदी केली आहे.

  • Maharashtra minister entry ban in belagavi : १ नोव्हेंबर रोजी बेळगावात काळा दिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित महाराष्ट्रातील तीन मंत्री व एका खासदाराला प्रवेशबंदी केली आहे.

कर्नाटक स्थापना दिवशी बेळगावात काळा दिवस साजरा करण्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील तीन मंत्री व एका खासदाराला प्रवेध बंदी केली आहे. याबाबत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील चार नेत्यांना बेळगावात प्रदेश करण्यास बंदी आदेश लागू केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

प्रवेशबंदी लादलेल्यांमध्ये यामध्ये मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांचा समावेश आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तीन मंत्र्यांसह खासदर व अन्य लोकांनाआमंत्रितकरण्यात आले होते.

नोव्हेंबर (बुधवारी) काळ्या दिनी मराठी जनतेच्या निषेध फेरीत आणि जाहीर सभेत सहभागी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मंत्री शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्यावर बेळगाव जिल्हा बंदी घोषित केली आहे.

मंत्री शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर हे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री आहेत. तर खासदार धैर्यशील माने हे तज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १ नोव्हेंबर रोजीच्या काळ्या दिनाला हे मंत्री उपस्थित राहून सीमाभागातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतील, त्यामुळे मराठी आणि कन्नड भाषिकांत संघर्ष निर्माण होईल, यामुळे त्यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

ही बंदी ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत ही बंदी असणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या फेरीला आणि जाहीर सभेला या मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवू नये, असे सूचित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद सुरू असून प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीनेबुधवारी बेळगाव शहरासह अनेक जिल्ह्यातील अनेक भागात काळा दिवस साजरा करण्याची तयारी केली आहे. कन्नड समर्थक संघटनाही याचा विरोध करू शकतात. यामुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या