मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Karnataka election 2023 : पक्ष बघू नका.. मराठी उमेदवारालाच मतदान करा, राज ठाकरेंचे सीमा भागातील नागरिकांना आवाहन

Karnataka election 2023 : पक्ष बघू नका.. मराठी उमेदवारालाच मतदान करा, राज ठाकरेंचे सीमा भागातील नागरिकांना आवाहन

May 08, 2023, 04:00 PM IST

  •  Raj Thackerays appeal to marathi voters : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणताही असो, मतदान मराठी उमेदवारालाच करा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना केलं आहे.

Raj Thackeray

Raj Thackeraysappealtomarathivoters : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणताही असो,मतदान मराठी उमेदवारालाच करा,असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजठाकरेयांनी सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना केलं आहे.

  •  Raj Thackerays appeal to marathi voters : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणताही असो, मतदान मराठी उमेदवारालाच करा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना केलं आहे.

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांची फळी कर्नाटकात उतरली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील नागरिकांना आवाहन केले आहे की,कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणताही असो,मतदान मराठी उमेदवारालाच करा.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

राज ठाकरे यांनीसीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना उद्देशून ट्विट केले आहे की, निवडून आल्यावरमराठी उमेदवारांनी मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवरील अन्याय याविरोधात विधानसभेत वाचा फोडायला हवी.

गेल्या काही महिन्यापूर्वी जत तालुक्यातील ४० गावांच्या मुद्यांवरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला होता. दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. मात्र अजूनही हा तिढा सुटलेला नाही. मराठी भाषिक आणि कन्नडिगांमधील वाद कायम आहे. त्यातच कर्नाटकात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी उमेदवारांनाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत.

 

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.

 

सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.

पुढील बातम्या