मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganesh Visarjan 2023 : बाप्पांसमोर डान्स करा अन् बक्कळ कमाई करा, पुण्यातली व्हायरल पोस्ट पाहिलीत का?

Ganesh Visarjan 2023 : बाप्पांसमोर डान्स करा अन् बक्कळ कमाई करा, पुण्यातली व्हायरल पोस्ट पाहिलीत का?

Sep 26, 2023, 08:47 AM IST

    • Ganesh Visarjan 2023 : पुण्यासह मुंबई आणि नाशिकमध्ये गणेश विसर्जनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता पुण्यात एक जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
Ganesh Visarjan 2023 Pune City (HT)

Ganesh Visarjan 2023 : पुण्यासह मुंबई आणि नाशिकमध्ये गणेश विसर्जनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता पुण्यात एक जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

    • Ganesh Visarjan 2023 : पुण्यासह मुंबई आणि नाशिकमध्ये गणेश विसर्जनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता पुण्यात एक जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

Ganesh Visarjan 2023 Pune City : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गणपती विसर्जनाची जोरदार तयारी सुरू आहे. पोलिसांनी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. गणेश मंडळं आणि भाविकांमध्ये विसर्जनासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी अनेक लोकांनी लाडक्या बाप्पाचा अखेरचा निरोप घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता पुण्यात बाप्पांसमोर डान्स करण्यासाठी नोकरीची जाहिरात एका वृत्तपत्रात देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गणरायासमोर डान्स करण्यासाठी तरुणाईला एका दिवसाच्या नोकरीची संधी देण्यात आली असून त्यासाठी मानधनही देण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

काय आहे व्हायरल पोस्ट?

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी मुलं हवीत, अशी जाहिरात एका मराठी वृत्तपत्रात देण्यात आली आहे. 'पुणेरी स्पिक्स' या एक्स हँडलवरून व्हायरल जाहिरात शेयर करण्यात आली असून त्यात आयोजकांचा नंबर देखील देण्यात आला आहे. गणपती विसर्जन सोहळ्यात डान्स करण्यासाठी १८ ते ३० वयोगटातील माणसं हवी, त्यांना प्रतिदिवस ३०० रुपये देण्यात येतील, असं व्हायरल जाहिरातीत सांगण्यात आलं आहे.

गणपतीची विसर्जन मिरवणूक २७ सप्टेंबरला निघणार असून त्यावेळी डान्स करणाऱ्यांना प्रतिव्यक्ती ३०० रुपये देण्यात येणार असल्याने त्यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी व्हायरल पोस्ट शेयर करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

गणेश मंडळाच्या आयोजकांनी कोणत्या वृत्तपत्रात जाहिरात दिलीय, याची माहिती समजू शकलेली नाही. परंतु त्यात मोबाईल नंबर देण्यात आलेला असल्याने अनेकांना त्यावर फोन करण्यास सुरुवात केली आहे. 'खाण्यापिण्याची काही सोय आहे का?, घशाला कोरड पडली तर काय करायचं? आणि नोकरीसाठी ऑडिशन द्यावं लागणार का?', असे अनेक प्रश्न लोकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. व्हायरल जाहिरातीत देण्यात आलेली नोकरी ही केवळ एका दिवसापुरतीच असून त्यासाठी लोकांना विसर्जनाच्याच दिवशी बोलावण्यात आलं आहे.

पुढील बातम्या