मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra Awhad: आमचं ठरलंय...; जयंत पाटील सत्तेत सामील होण्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

Jitendra Awhad: आमचं ठरलंय...; जयंत पाटील सत्तेत सामील होण्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

Aug 06, 2023, 11:54 PM IST

  • Jitendra Awhads tweet: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील सत्तेत सामील होण्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले आहे.

Jitendra Awhad (HT_PRINT)

Jitendra Awhads tweet: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील सत्तेत सामील होण्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले आहे.

  • Jitendra Awhads tweet: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील सत्तेत सामील होण्याच्या चर्चेवर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले आहे.

Jitendra Awhad On Jayant Patil: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू नेते जयंत पाटील यांनी काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, जयंत पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतल्याचं वृत्त फेटाळून लावले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही जयंत पाटील कुठेही जाणार नसल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील यांच्याबद्दल जाणूनबुजून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेतली. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून जयंत पाटील कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. "राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे. जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले, ते मंत्री होणार, त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातेय, हे आम्हांला बरोबर समजतंय, असे जितेंद्र आव्हाडने म्हटले.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की," जितेंद्र, पवार साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही. मला वाटत नाही की, प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की, आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत. आम्ही मागेच सांगितलं आहे की, "आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत." त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. कृपयाअशा अफवांवर विश्वास ठेवू नका."

"आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही.सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही", असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या