मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jayant Patil : एकनाथ शिंदेंकडून नैतिकतेची अपेक्षा करणं हा त्यांच्यावर अन्याय; जयंत पाटील डेंजर बोलले!

Jayant Patil : एकनाथ शिंदेंकडून नैतिकतेची अपेक्षा करणं हा त्यांच्यावर अन्याय; जयंत पाटील डेंजर बोलले!

May 11, 2023, 05:42 PM IST

  • Jayant Patil on Eknath Shinde : महाविकास आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडं राजीनाम्याची मागणी करत असताना जयंत पाटील यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे.

Jayant Patil

Jayant Patil on Eknath Shinde : महाविकास आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडं राजीनाम्याची मागणी करत असताना जयंत पाटील यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे.

  • Jayant Patil on Eknath Shinde : महाविकास आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडं राजीनाम्याची मागणी करत असताना जयंत पाटील यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे.

Jayant Patil on Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीच्या बहुतेक नेत्यांनी शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मात्र यावर काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

ते पत्रकारांशी बोलत होते. 'सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणं जास्त अन्यायकारक होईल असं वाटतं. कारण, ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केलं, त्यावेळी त्यांनी कोणतीही नैतिकता पाळली नव्हती. त्यामुळं पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणं योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणं आणि मुख्यमंत्री म्हणून राहणं यालाच त्यांची प्राथमिकता असेल तर ते राजीनामा देणार नाहीत. त्यामुळं त्यांनी काय करावं हा सल्ला देण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

हा क्षणिक आनंद

'शिंदे सरकार वाचलं हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसं-बसं सरकार वाचलं ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपनं महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

'राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टानं सांगितलं. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्यानं विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळं विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टानं, ज्या मुद्यांची नोंद केली, त्या चौकटीत राहून काम करावं लागेल. यामध्ये विधानसभाध्यक्ष वेळकाढूपणा करू शकणार नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले.

राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असं कोर्टानं सांगितलं. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होतं हे स्पष्ट होतं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

राज्यात सत्ता कोणाची ही आता जनतेला महत्त्वाचं नाही!

राज्यातील सरकार हे बेकायदेशीर असल्याचं सिद्ध झाल्यानं राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्त्वाचं नाही. या निर्णयामुळं राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे होती. ती आता अधिक भक्कमपणे आघाडीच्या मागे उभी राहील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या