मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुम्ही आव्हान दिलं पण ‘या’ कारणामुळे कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

तुम्ही आव्हान दिलं पण ‘या’ कारणामुळे कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

Dec 27, 2023, 11:39 PM IST

  • Jayant Patil On Ajit Pawar : काही लोक अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे आव्हान देत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात पोहोचवणाऱ्या कोल्हे यांना पराभूत करणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी अजित पवारांच्या विधानावर केली आहे.

Jayant Patil On Ajit Pawar

Jayant Patil On Ajit Pawar : काही लोकअमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे आव्हान देत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात पोहोचवणाऱ्या कोल्हे यांना पराभूत करणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी अजित पवारांच्या विधानावर केली आहे.

  • Jayant Patil On Ajit Pawar : काही लोक अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे आव्हान देत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरात पोहोचवणाऱ्या कोल्हे यांना पराभूत करणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी अजित पवारांच्या विधानावर केली आहे.

पुण्यातील खेड तालुक्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकअमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे आव्हान देत आहेत. मात्र ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घरा-घरांत पोहचवले, त्यांना पराभूत करणे सोपे नाही, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

जयंत पाटील म्हणाले की,देशात आणि राज्यातील अनेक खासदारांनी गेल्या दोन-तीन वर्षात संसदेत अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु सर्वात जास्त प्रभावीपणे आपल्या राज्यातील व मतदारसंघातील मांडणी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची आहे. तुम्ही आव्हान दिलंपण यात दुरुस्ती व्हायला हवी. संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांची खरी ओळख अमोल कोल्हेंनी जनतेला करून दिली. अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे. येथे उपस्थित असलेल्या तरुण पिढीने युट्युबवर केवळ अमोल कोल्हे टाका आणि त्यांचे संसदेतले भाषण ऐका. ते एखाद्या विषयावर बोलले नाहीत, असं कधीच झाले नाही. त्यांनी जे काही प्रश्न मांडले ते नेहमी प्रभावीपणेच मांडले, असं जयंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, चार पाच वर्षात मी काम केलं नसत तर त्यांनी तेव्हाच माझे कान धरले असते. पाच वर्षाच्या कामाबद्दल ते आताच का बोलले हा प्रश्न मला पडतोय. अजित दादा फार मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेतृत्वावर बोलणं योग्य ठरणार नाही. माझं काही चुकलं तर त्यांना कान पकडण्याचा अधिकार आहे. मला पहिल्याच टर्म मध्ये २ वेळा संसदरत्न मिळाला. राज्यातील बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावला. संसदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. कोविडच्या काळात दादा सर्वाधिक बैठका घेत होते. त्यावेळी कोण अटेंड्स करत होत. हे त्यांनाही माहित आहे. इंद्रायणी प्रकल्प कोणी पुढाकार घेतला हे दादांना माहित असेलच.

५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो. पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे. आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूरमध्ये पर्याय देणार, तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दाखवला आहे.

अमोल कोल्हे यांच्या निलंबनाबद्दल अजित पवारांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, या खासदारांनी वेळीच मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, यांना उमेदवारी मी दिली,निवडून आणण्यासाठी दिलीपराव वळसे पाटील व मी जीवाचं रान केलं. आज आंदोलन वगैरे करतायेत हे ठीक आहे, मात्र मधल्या काळामध्ये हे मतदारसंघातील कोणत्याच विधानसभा क्षेत्रात फिरकलेच नाहीत. मध्यंतरी हेच माझ्याकडे येऊन राजीनामा देण्याची गोष्ट करत होते" असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी दोन दिवसापूर्वी केला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या