मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुलाबराव पाटलांनंतर आता एकनाथ खडसेंनाही पाचशे रुपयांचा दंड, नेमकं काय आहे प्रकरण ?

गुलाबराव पाटलांनंतर आता एकनाथ खडसेंनाही पाचशे रुपयांचा दंड, नेमकं काय आहे प्रकरण ?

Jun 21, 2023, 04:37 PM IST

  • Jalgaon news : सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याप्रकरणी जळगाव न्यायालयाने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे दोघांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

gulabrao patil and Eknath khadse

Jalgaonnews : सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याप्रकरणी जळगाव न्यायालयाने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे दोघांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

  • Jalgaon news : सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याप्रकरणी जळगाव न्यायालयाने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे दोघांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

Eknath Khadse : जळगाव न्यायालयाने सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याप्रकरणी मंगळवारी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना पाचशे रुपये दंड केला होता. त्यानंतर आज आमदार एकनाथ खडसे हे देखील सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने त्यांनाही न्यायालयाने पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. एकाच खटल्याच्या सुनावणीसाठी दोघेही गैरहजर राहिल्याने न्यायालयाने दोघांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शिंदे सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१६ मध्ये एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर या आरोपामुळे आपली समाजात प्रतिमा मलिन झाली, बदनामी झाली असल्याचं म्हणत एकनाथ खडसे यांनी जळगाव न्यायालयात गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याची मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायालयाने पाचशे रुपये दंड केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

तर आजच्या सुनावणीत मंत्री गुलाबराव पाटील आणि खडसे दोन्ही गैरहजर असले तरी खडसे यांनी उलट तपासणीसाठी न्यायालयात हजर असणे आवश्यक होते. मात्र वैद्यकीय कारणास्तव खडसे हे आज सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर न राहता वकिलाच्या मार्फत त्यांनी पुढील तारीख मिळण्यासाठी कोर्टाकडे विनंती अर्ज केला. या अर्जाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वकिलांनीही कोणतीही हरकत घेतली नाही.

 

न्यायालयानेही अर्ज मंजूर करत पुढील सुनावणीची तारीख २७ जून ठेवली असली तरी आज गैरहजर राहिल्याबद्दल एकनाथ खडसे यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या