मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी जाताना दुचाकीला अपघात; मुलाच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू

दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी जाताना दुचाकीला अपघात; मुलाच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू

Feb 28, 2023, 05:10 PM IST

  • Jalgaon Road Accident: जळगावच्या रंडोल- म्हसावद रोडवर डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Two Wheeler Accident (HT)

Jalgaon Road Accident: जळगावच्या रंडोल- म्हसावद रोडवर डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • Jalgaon Road Accident: जळगावच्या रंडोल- म्हसावद रोडवर डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Jalgaon Bike Accident: जळगावमध्ये नातेवाईकांच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी बाप-लेकाच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. या अपघात मुलाच्या डोळ्यांसमोर वडिलांना आपला जीव गमवावा लागलाय. ही घटना एरंडोल-म्हसावद रोडवर सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर डंपरचालक वाहन घटनास्थळी सोडून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

श्रावण दगा पाटील (वय, ६७) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्रावण पाटील हे कुटुंबासह जळगावच्या धरणगाव तालुक्यातील कल्याण खुर्द गावात वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी श्रावण पाटील यांच्या बहिणीच्या सासूचा दशक्रिया विधी कार्यक्रम होता. यामुळे श्रावण पाटील हे त्यांचा मुलगा अमोल पाटील यांच्यासह दुचाकीवरून पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथे जात होते. मात्र, एरंडोल-म्हसावद रोडवर निखिल पेट्रोलपंपाजवळ पेट्रोल भरण्यासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात श्रावण पाटील यांच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अमोल यास काहीच दुखापत झालेली नाही.अमोल यास काहीच दुखापत झालेली नाही.

या घटनेनंतर डंपरचालकाने घटनास्थळी डंपर सोडून एरंडोल पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश पाटील हे करत आहेत.

मयत श्रावण हे शेतमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी नर्मदाबाई आणि मुलगा अमोल, सून नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने कल्याणे खुर्द गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या अपघातातील दोषीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशाही मागणीने जोर धरला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या