मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नियतीचा घाला.. लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणाचा अपघात; दोन जण जागीच ठार, एक गंभीर

नियतीचा घाला.. लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणाचा अपघात; दोन जण जागीच ठार, एक गंभीर

Jan 16, 2023, 11:15 PM IST

  • जळगाव-एरंडोल मार्गावर भरधाव कार व मोटारसायकलीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणाचा अपघात

जळगाव-एरंडोल मार्गावर भरधाव कार व मोटारसायकलीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

  • जळगाव-एरंडोल मार्गावर भरधाव कार व मोटारसायकलीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

जळगाव - जळगाव एरंडोल मार्गावरभरधाव कार व दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात पिंपळकोठा (ता. एरंडोल) जवळ सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

या अपघातात नितिन जामसिंग पाटील (२१) आणि घन:श्याम भानुदास बडगुजर (२०, दोघे रा. पिंपळकोठा बुद्रुक ता. एरंडोल) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या अपघातात ज्ञानेश्वर गणसिंग पाटील (२२, रा. पिंपळकोठा बुद्रुक) हा पादचारी तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरधाव वेगाने जाणारी कार जळगावहून नाशिककडे जात होती. या गाडीने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य करून जखमी ज्ञानेश्वर पाटील यास पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. ज्ञानेश्वर याचा २१ जानेवारीला विवाह होता, अशी माहिती मिळाली आहे. मात्र विवाहास पाच दिवस शिल्लक असताना त्याचा अपघात झाला असून त्याची स्थिती गंभीर आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या