मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Iqbal singh chahal : इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती

Iqbal singh chahal : इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती

Mar 22, 2024, 05:43 PM IST

  • Iqbal Singh Chahal News : मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवल्यानंतर इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती

Iqbal Singh Chahal News : मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवल्यानंतर इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Iqbal Singh Chahal News : मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवल्यानंतर इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी भूषण गगराणी यांच्या हातात मुंबई पालिकेची सूत्रे सोपवण्यात आली होती. मात्र चहल यांना दुसऱ्या जागी नियुक्ती देण्यात आली नव्हती. आता इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai, Pune weather update : मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी इक्बाल सिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवलं होतं. आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर, जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. या आदेशानुसार इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे आणि पी.वेलारासू यांची बदली करणं बंधनकारक झालं. इक्बाल सिंह चहल यांना अपवादात्मक स्थितीत मुंबई पालिका आयुक्तपदावर कायम ठेवण्यात यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ती मागणी आयोगाने फेटाळली होती. 

मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त आयुक्तपदी काम केले आहे. त्यानंतर आज इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल यांनी मुंबईच्या आयुक्तपदी काम करताना महाविकास आघाडी ते महायुतीचे सरकार ही राजकीय स्थित्यंतरे अनुभवली आहेत.  ठाकरे तसेच शिंदे सरकारशी जुळवून घेणारे अधिकारी म्हणूनही ते ओळखले गेले. आता चहल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या