मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  India Alliance : २०१९ च्या निवडणुकीत कमी मतं मिळूनही भाजप सत्तेत कसा? अशोक चव्हाणांनी सांगितलं संपूर्ण गणित

India Alliance : २०१९ च्या निवडणुकीत कमी मतं मिळूनही भाजप सत्तेत कसा? अशोक चव्हाणांनी सांगितलं संपूर्ण गणित

Aug 30, 2023, 06:54 PM IST

  • India Alliance : अशोक चव्हाण म्हणाले, २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतं मिळुनही भाजपने सत्ता राखली होती. कारण इंडियात सामील असणारे घटक पक्ष वेगळं लढले होते. 

India Alliance pc

India Alliance : अशोक चव्हाण म्हणाले,२०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतं मिळुनही भाजपने सत्ता राखली होती. कारण इंडियात सामील असणारे घटक पक्ष वेगळं लढले होते.

  • India Alliance : अशोक चव्हाण म्हणाले, २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतं मिळुनही भाजपने सत्ता राखली होती. कारण इंडियात सामील असणारे घटक पक्ष वेगळं लढले होते. 

मुंबईत इंडिया आघाडीची उद्यापासून दोन दिवसीय बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी इंडिया आघाडीची मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये पत्रकार झाली. नाना पटोले, अशोक चव्हाण, शरद पवार व उद्धव ठाकरे आदिंनी या परिषदेला संबोधित केले.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतं मिळुनही भाजपने सत्ता राखली होती. कारण इंडियात सामील असणारे घटक पक्ष वेगळं लढले होते. २०१९ च्या निवडणूक इंडियातील घटक पक्षांनी २३ कोटी मते मिळवली होती. तर भाजपला २२ कोटी मतं मिळाली होती. कमी मतं मिळवूनही भाजप सत्तेत परतली कारण त्यावेळी इंडियातील काही घटकपक्ष एकत्र लढू शकले नव्हते. यावेळी हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत नक्की जिंकण्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला..

अशोक चव्हाण म्हणाले, कोणाला विरोध करणे हा आमचा अजेंडा नाही. विकासाची कामं करायची आहेत. शिवाय देशातील फॅसिस्ट विचारसरणी थांबवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

या इंडियाच्या आघाडीत २८ पक्ष व ११ मुख्यमंत्री सहभागी आहेत. मध्यप्रदेश, गोवा आणि महाराष्ट्राला तोडण्याचे काम भाजपने केले. कर्नाटकात मात्र सरकार फोडल्यानंतर काँग्रेस मोठ्या संख्याबळाने सत्तेत आली. जसं बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी भाऊ रक्षाबंधनदिवशी घेतो. त्याचप्रमाणे इंडियाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आमची आघाडी शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जाणारी आहे. इंडिया आघाडीच्या बंगळुरातील बैठकीत २६  पक्ष होते याचा आकडा आता २८ झाला आहे. 

विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले की, आघाडीतील पक्षांची विचारधारा वेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करणे हा एकमेव उद्दिष्ठ घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्याची लढाई झाली होती. ‘चले जाव’ची सुरुवात मुंबईतूनच झाली होती. का आणि कोणासाठी? ब्रिटीशही विकास करत होते, जर त्यांना आपण पळवले नसते, पूर्ण ताकद रस्त्यावर उतरली नसती तर ब्रिटीशही विकास करतच होते. आम्हाला विकास हवाय, पण त्याचसोबत स्वातंत्र्यही हवे. विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं विधान ठाकरे यांनी केलं. 

पुढील बातम्या