मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार..! ‘या’ विभागात पुढील पाच दिवस यलो अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार..! ‘या’ विभागात पुढील पाच दिवस यलो अलर्ट

Jul 15, 2023, 11:17 PM IST

  • rain in Maharashtra :हवामान विभागाने विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात पावसाची रिपरिप वाढणार आहे.

rain in Maharashtra

rain in Maharashtra :हवामान विभागाने विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात पावसाची रिपरिप वाढणार आहे.

  • rain in Maharashtra :हवामान विभागाने विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात पावसाची रिपरिप वाढणार आहे.

मुंबई – उत्तर भारतात महापुराने थैमान घातले असले तरी जुलै महिन्यातील पंधरवडा संपला तरी महाराष्ट्रात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. यामुळे राज्यातील अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. आता हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात पावसाची रिपरिप वाढणार आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

१७ जुलैपासून तळ कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. १८ जुलैपासून मुंबई आणि उपनगरात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्याने पेरण्या लांबल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचे संकट आले आहे. सुरुवातीच्या पावसानंतर वरुणराजाने हुलकावणी दिल्याने मराठवाडा, खान्देश, पुणे, पश्चिम विदर्भासह मध्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. दुबार पेरण्यांमुळे बियाण्यांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत ५९ टक्के पेरण्या झाल्या असून बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या