मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Weather Update : पुढच्या २४ तासांत चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यावर धडकणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Weather Update : पुढच्या २४ तासांत चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यावर धडकणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Oct 20, 2023, 11:21 AM IST

  • Tej cyclone to hit Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

mumbai weather news today (HT)

Tej cyclone to hit Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

  • Tej cyclone to hit Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

mumbai weather news today : महाराष्ट्रासह उत्तर भारतातील राज्यांतून मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळं राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतील नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत आहे. हवामान बदलामुळं सामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं तेज चक्रीवादळ पुढील काही तासांमध्ये मुंबईच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रिवादळ महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातच्या किनारी भागांत धडकणार आहे. त्यामुळं हवामान खात्याने किनारी भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. २१ ऑक्टोबरच्या दुपारी किंवा संध्याकाळी तेज चक्रिवादळ मुंबईसह कोकणच्या किनारी भागांमध्ये धडकण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळं मुंबईकर आधीच उकाड्याने हैराण झालेले आहे. परंतु आता चक्रिवादळाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने मुंबईत पुढील काही तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मध्य आणि दक्षिण अरबी समुद्रातील लक्षदीप बेट आणि कोमोरीन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचे विखुरलेल्या स्वरूपातील ढग तयार होणार आहे. परिणामी कर्नाटक, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारी भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातील पश्चिम वायव्य दिशांना येणाऱ्या वादळामुळं मुंबईकरांनी सतर्क राहण्याच्या सूचना आयएमडीकडून करण्यात आल्या आहे. समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीपर्यंच्या लाटा तयार होण्याचा अंदाजही आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील बातम्या