मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Updates : पावसाळा संपताच चटका वाढला, थंडी कधी वाढणार?, पाहा हवामान अंदाज

Maharashtra Weather Updates : पावसाळा संपताच चटका वाढला, थंडी कधी वाढणार?, पाहा हवामान अंदाज

Oct 13, 2023, 05:17 PM IST

    • Maharashtra Weather Updates : मान्सून माघारी परतल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.
Maharashtra Weather Updates (HT)

Maharashtra Weather Updates : मान्सून माघारी परतल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.

    • Maharashtra Weather Updates : मान्सून माघारी परतल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.

Maharashtra Weather Updates : पावसाळा संपताच राज्यातील अनेक भागांमधील उष्णतेत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत काही दिवसांतच तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं पावसामुळं सुखावलेल्या सामान्यांच्या उष्णतेमुळं चिंता वाढल्या आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच आता हवामान खात्याने महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचं तापमान हे ३५ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा स्थिर राहणार असून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हळूहळू तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता थंडीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडीचा कडाका कधी वाढणार?

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून उष्णतेचा पारा खाली येणार आहे. परिणामी थंडीचा कडाका वाढणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रासह उत्तर भारतातील राज्यांमधून मान्सूनने माघारीचा प्रवास सुरू केला होता. त्यामुळं पावसाळा संपूर्णत: संपला असून आता थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु सुरुवातीच्या काही दिवसांत उष्णता आणि त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील बातम्या