मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna Accident : मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला; अपघात पती-पत्नी ठार

Jalna Accident : मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला; अपघात पती-पत्नी ठार

Mar 12, 2023, 11:48 AM IST

    • Jalna Accident : आपल्या मुलीच्या भेटीला जाणाऱ्या पती पत्नीवर काळाने घाला घातला आहे. भारधाव मोटरीने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
Two Wheeler Accident (HT)

Jalna Accident : आपल्या मुलीच्या भेटीला जाणाऱ्या पती पत्नीवर काळाने घाला घातला आहे. भारधाव मोटरीने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

    • Jalna Accident : आपल्या मुलीच्या भेटीला जाणाऱ्या पती पत्नीवर काळाने घाला घातला आहे. भारधाव मोटरीने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

जालनाः आपल्या मुलीच्या भेटीला जाणाऱ्या पती पत्नीवर काळाने घाला घातला आहे. भारधाव मोटरीने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथे ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

दत्तू वामन बोराडे (वय ६५) व कमलबाई बोराडे (वय ५९) असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृध्द दाम्पत्य जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोदबाजार (ता.सिल्लोड) पोलीस ठाण्याच्या समोर खामगावकडे वळण घेत होते. यावेळी भरधाव क्रुझरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

ही दोघेही मुलीकडे जाऊन तिची भेट घेरणार होते. यामुळे ते सकाळी दुचाकीवरून घराबाहेर पडले. पण काळाने मात्र, त्यांच्यावर घाला घातला. हे दोघे फुलंब्री सिल्लोड मार्गावरील खामगाव फाट्यापर्यंत आले. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या क्रुझरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात भारती करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वडोदबाजार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास मोरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वडोदबाजार ठाण्यात क्रुझर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी शोकाकूल वातावरणात दगडवाडी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या