मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस परवानगी कशी?; राज ठाकरे यांचा सवाल

मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस परवानगी कशी?; राज ठाकरे यांचा सवाल

May 04, 2022, 01:56 PM IST

    • मशिदींवरील भोंग्यांच्या (Loudspeaker Row) मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज ठाकरे

मशिदींवरील भोंग्यांच्या (Loudspeaker Row) मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    • मशिदींवरील भोंग्यांच्या (Loudspeaker Row) मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळेस एखादी परवानगी मागितली तर ती त्या दिवसापुरती किंवा उत्सवापुरती दिली जाते, मग मशिदींवरील भोंग्यांना ३६५ परवानगी कशी मिळते,' असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. 'भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहील, असंही राज यांनी ठणकावलं.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवले गेले नाहीत तर ४ मे पासून भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवली जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळं राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. खबरदारी म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. तसंच, मुस्लिम मौलवींनाही काही सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही आज काही मशिदींवर पहाटे पाच वाजता भोंगे लावून अजान देण्यात आली. त्याला विरोध म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी हनुमान चालिसा वाजवली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली.

भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन हा एका दिवसाचा विषय नाही. हे आंदोलन सुरूच राहणार, असं राज यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. ‘मुंबईत ११४० मशिदी आहेत. त्यातील १३५ मशिदींवर आज पहाटे भोंगे लावून अजान दिली गेली. या मशिदींवर पोलीस काय कारवाई करणार आहेत, असा सवाल त्यांनी केला. ‘महाराष्ट्रातील बहुतेक मशिदी अनधिकृत आहेत. त्यावरील भोंगे अनधिकृत आहेत. मग त्याला अधिकृत परवानगी कशी मिळते?; असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 'सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी व्हावी एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यासाठी आमच्या लोकांची धरपकड सुरू आहे. याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

'मुळात हा श्रेयाचा विषय नाही. आम्ही लोकांना होणाऱ्या त्रासाकडं लक्ष वेधत आहोत. जी काही प्रार्थना करायची आहे ती मशिदीत किंवा घरी करा. त्याचा लोकांना त्रास का? लहान मुलं, आजारी लोक असतात, त्यांनाही ह्या सगळ्याचा त्रास होतो. माणुसकीपेक्षा धर्म मोठा आहे का? हे सगळं बंद व्हायलाच पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या