मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Helmet Compulsion : पहिल्याच दिवशी इतक्या मुंबईकरांना भोगावा लागला भुर्दंड

Helmet Compulsion : पहिल्याच दिवशी इतक्या मुंबईकरांना भोगावा लागला भुर्दंड

Jun 10, 2022, 02:19 PM IST

  • कायद्याचं पालन करा अन्यथा परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवा असं ट्विट (Tweet) मुंबई पोलिसांनी करत, मुंबईकर दुचाकीस्वारांना कडक इशारा दिलाय. 

दुचाकीस्वारांवर कारवाई करताना पोलीस (हिंदुस्तान टाइम्स)

कायद्याचं पालन करा अन्यथा परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवा असं ट्विट (Tweet) मुंबई पोलिसांनी करत, मुंबईकर दुचाकीस्वारांना कडक इशारा दिलाय.

  • कायद्याचं पालन करा अन्यथा परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवा असं ट्विट (Tweet) मुंबई पोलिसांनी करत, मुंबईकर दुचाकीस्वारांना कडक इशारा दिलाय. 

मुंबईत हेल्मेट (Helmet) सक्ती होतीच, मात्र दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या म्हणजेच पिलियन रायडरलाही हेल्मेटसक्ती केली जाणार असं मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितलं होतं. त्यानुसार मुंबईकरांना (Mumbai) हेल्मेट खरेदी करण्यासाठी १५ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. आता मात्र ही मुदत संपली आणि मुंबई वाहतूक पोलिसांनी थेट कारवाई करायला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

मुंबईत ९ जून रोजी मुंबई वाहतूक पोलिसांनी एका दिवसात तब्बल ६ हजार २७१ मुंबईकरांवर हा कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट न घातलेलं आढळलेले २ हजार ३३४ बहाद्दर आढळले आहेत, तर सर्वात जास्त प्रमाणात दंड वसूल केला गेलाय त्यात दुचाकीस्वाराच्या मागे बसेलेले लोकं आहेत. यांना पिलियन रायडर असं म्हणतात. याच दुचाकीस्वाराच्या मागच्या सीटवर बसलेल्या मात्र हेल्मेट न घातलेल्या ३ हजार ४२१ व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली. मंबई वाहतूक पोलिसांनी एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी याआधी दुचाकीस्वाराला हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं होतं. आता मात्र दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणं अनिवार्य केलं गेलं आहे. हे पाऊल मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी उचललं असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.

मुंबईचे वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी मुंबई पोलिसांना थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी मुंबईत ५० वाहतूक चौक्या अलर्ट राहतील. ज्यांच्याकडे हेल्मेट नसेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.त्यांचा परवाना ३ महिने रद्द केला जाईल. त्यांना ५०० रुपये दंडही भरावा लागेल असे आदेश राजतिलक रोशन यांनी दिले होतं. त्यानुसार मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये गुरुवारी दिसून आले. मुंबई पोलिसांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दुचाकीस्वारांना कडक शब्दात खडसावलं आहे.

बाईकर्स लक्ष द्या! दुचाकीस्वार आणि हेल्मेट अन पिलियन रायडर्सना मोटार वाहन कायद्यांतर्गत गंभीर दंडाला सामोरे जावे लागेल. तुमच्या सुरक्षिततेसाठी, तुम्ही नियमांचे पालन करत असल्याची खात्री करा अशी पोस्ट पोलिसांनी ट्विटरवर टाकत मुंबईकर दुचाकीस्वारांना नियम पाळा अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जा असा इशाराच दिला आहे.

मुंबईकर मात्र या निर्णयाचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत. सर्व नियम हे फक्त मुंबईकरांसाठी का असतात? असा प्रश्न विचारताना मुंबईकर पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पोलिसांशी वाद घालण्याचे प्रकारही पाहायला मिळाले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या