मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज

Sep 13, 2022, 09:37 AM IST

    • Heavy Rain Forecast : राज्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केले आहे. मुंबईत कालरात्री पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Heavy Rain Forecast : राज्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केले आहे. मुंबईत कालरात्री पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

    • Heavy Rain Forecast : राज्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केले आहे. मुंबईत कालरात्री पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केले आहे. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. येत्या १७ आणि १८ तारखे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी ताबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र, गुजरात, ओडीशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता या पूर्वीच हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार राज्यात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक तर विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपुर या जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पासून कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने देशातील काही राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज संदीप माहापात्रा यांनी व्यक्त केला आहे. या मुळे किनारपट्टीवर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून या दरम्यान समुद्रात जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ओडिशा येथील किनारपट्टीजवळ कमी दाबचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, कोकण तर मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. पुण्यात रविवारी चार ते पाच तास जोरदार पाऊस झाल्याने पुणेकरांची दाणादाण उडाली होती. रस्त्यावर पाणी सचल्याने पुरस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी तर आजही सकाळपासून पासून सुरू आहे. नगर जिल्ह्यातील राहता, कोपरगाव, शिर्डी, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे काही भागात पुन्हा पुर सदृश स्थिती निर्माण झाली आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होलीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर वर्धमनेरी-आर्वी मार्ग बंद झाला आहे. तसेच चानकी-भगवा मार्ग बंद झाला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आला आहे. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या