मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gunaratna Sadavarte : माझ्या नादाला लागाल तर तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढेन; सदावर्तेंचा राज ठाकरेंना इशारा

Gunaratna Sadavarte : माझ्या नादाला लागाल तर तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढेन; सदावर्तेंचा राज ठाकरेंना इशारा

Oct 11, 2023, 01:01 PM IST

  • Gunaratna Sadavarte challenges Raj Thackeray : एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे.

Gunaratna Sadavarte vs Raj Thackeray

Gunaratna Sadavarte challenges Raj Thackeray : एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे.

  • Gunaratna Sadavarte challenges Raj Thackeray : एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे.

Gunaratna Sadavarte vs Raj Thackeray : टोलच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कामगार नेते गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. ‘मनसेचे गुंड वृत्तीचे लोक मला धमक्या देत आहेत. पण मी त्यांना घाबरत नाही. प्रभू श्रीरामचंद्र आणि नथुराम गोडसेचा (Nathuram Godse) विचार मानणारा मी माणूस आहे,’ असं सदावर्ते यांनी ठणकावलं. माझ्या नादाल लागाल तर सगळं बाहेर काढेन, असा गर्भित इशाराही त्यांनी राज ठाकरेंना दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

राज ठाकरे यांनी टोल दरवाढीस विरोध केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या टोलनाक्यांवर आंदोलनं सुरू केली होती. मुलुंड येथील टोलनाक्यावर जाळपोळ देखील करण्यात आली होती. मनसेच्या या आंदोलनाला विरोध करत सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसंच, टोलनाक्यावरील जाळपोळ प्रकरणात राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आज त्यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं.

एसटी कामगारांच्या काही प्रलंबित प्रश्नांवर गुणरत्न सदावर्ते यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना टोल प्रकरणावर भाष्य केलं. 'राज ठाकरे यांचे लोक मला धमक्या देत आहेत. महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं सांगत आहेत. हे लोक महाराष्ट्र अशांत करायला निघाले आहेत. त्यांना ताबडतोब वेसण घालण्याची गरज आहे, असं सदावर्ते म्हणाले.

'मी पोलिसांना याची कल्पना दिली आहे. मला माझ्या जिवाची भीती नाही. लाखो गुणरत्न सदावर्ते तयार झाले आहेत. आरएसएसच्या मुशीतून तयार झालेली माणसं आहेत. छाती पुढं काढून भारत हिंदू राष्ट्र आहे असं म्हणणारा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. मी जमिनीवरचा माणूस आहे. कोहिनूरवाला नाही. माझ्या नादी लागाल तर कायदेशीर मार्गानं मी सगळं बाहेर काढीन, असा इशारा त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. अनुचित काही घडू नये याची काळजी पोलीस घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मी परळ, लालबागमध्ये राहतो!

सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हानही दिलं. 'कष्टकरी जनसंघ अशा कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही. त्यामुळं राज ठाकरेंनी आपल्या पिलावळीला सांगावं हे धमक्याचं फोन करणं बंद करा. मी परळ, लालबागमध्ये राहतो. फोनवर धमक्या देण्याऐवजी समोर या. मी वन टू वन लढायला तयार आहे, असंही ते वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या