मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सदावर्तेंच्या गटाने पवारांच्या पॅनलसह मातब्बर संघटनांना धूळ चारत जिंकली निवडणूक, विजयानंतर नाचवले गोडसेंचे पोस्टर

सदावर्तेंच्या गटाने पवारांच्या पॅनलसह मातब्बर संघटनांना धूळ चारत जिंकली निवडणूक, विजयानंतर नाचवले गोडसेंचे पोस्टर

Jun 26, 2023, 08:00 PM IST

  • Gunratna sadavarte : सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळवला आहे.

state transport co operative bank election

Gunratna sadavarte : सदावर्तेंच्याएसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलनेस्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व१९जागांवर विजय मिळवला आहे.

  • Gunratna sadavarte : सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळवला आहे.

वादगस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे व एसटी आंदोलनाच्या दरम्यान राज्यभर प्रसिद्धीस आलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी आंदोलनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांवर सदावर्तेंची जादू कायम असल्याचं दिसतंय. संदीप शिंदे यांच्या एसटी कामगार संघटनेच्या पॅनलचा सदावर्ते यांच्या पॅनलने धुव्वा उडवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंक निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलनेबाजी मारली आहे. सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसे यांचे पोस्टर घेऊन जल्लोष केल्याचं सांगण्यात येत आहे. सदावर्ते यांच्या समर्थकांनी केलेल्या या कृत्यामुळे राज्यात पुन्हावाद उफाळण्याची शक्यता आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे काढले होते. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या अनेक विधानांमुळे खळबळ माजली होती.कधी मराठा आंदोलनावर भाष्य तर कधी गांधींजींचे मारेकरी नथुराम गोडसेचं समर्थन करताना ते बघायला मिळाले. सदावर्ते पहिल्यांदाच कुठल्यातरी निवडणुकीला सामोरे गेले होते. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवून सर्वच्या सर्व १९ जागा खिशात घातल्या आहेत.

 

एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान पार पडलं होतं. आज मुंबईतील कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन इथं मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते पॅनलमध्ये आणि शरद पवार पुरस्कृत कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये चुरस होती. पण या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व १९ जागांवर सदावर्ते पॅनलने विजय मिळवला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या