मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुणरत्न सदावर्तेंची १८ दिवसांनी सुटका; बाहेर येताच राज्य सरकारविरोधात कडाडले..

गुणरत्न सदावर्तेंची १८ दिवसांनी सुटका; बाहेर येताच राज्य सरकारविरोधात कडाडले..

Apr 26, 2022, 08:24 PM IST

    • वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच सदावर्ते राज्य सरकारवर कडाडले आहेत. तुरुंगात काय झाले हेही त्यांनी बाहेर येताच सांगितले.
गुणरत्न सदावर्तेंची सुटका

वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे.तुरुंगातून बाहेर येताच सदावर्ते राज्य सरकारवर कडाडले आहेत. तुरुंगात काय झाले हेही त्यांनी बाहेर येताच सांगितले.

    • वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच सदावर्ते राज्य सरकारवर कडाडले आहेत. तुरुंगात काय झाले हेही त्यांनी बाहेर येताच सांगितले.

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांच्या मुंबईतील निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच सदावर्ते राज्य सरकारवर कडाडले आहेत. तुरुंगात काय झाले हेही त्यांनी बाहेर येताच सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

सन २०२० मध्ये पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सदावर्ते आज संध्याकाळी ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय तुरुंगाबाहेर वाट पाहत होते. बाहेर येताच त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. तसेच राज्य सरकारविरोधात 'हम है हिंदुस्थानी' म्हणत छाती त्यांनी बडविली. 

सदावर्ते म्हणाले की, भारताच्या संविधानापेक्षा मोठा कोणी नाही. यापुढे आमचा केंद्रबिंदू असेल भ्रष्टाचार. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू. जय श्री राम, जय भीम आणि हम है हिंदुस्थानी म्हणणारे देश जिंकत असतात, आतापुरते एवढेच असे म्हणत पुढे बोलू, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे. 

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुख्य आरोपी तर ११५  कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणार की नाही याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

सदावर्तेविरोधात मुंबईनंतर सातारा, पुणे, कोल्हापूर, अकोला व सोलापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या